Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

संजय टाकळगव्हाणकर यांचे कोरोनावरील पुस्तक म्हणजे मानवी गुलामगीरीची उकलपेरणी:भ. मा. परसवाळे

हिंगोली:जागतिक मानवी इतिहासाचा अभ्यास करताना  औद्योगिक क्रांती, साम्राज्यविस्तार महायुद्धे ही इतिहासातील मोठी प्रकरणे आहेत या प्रत्येक प्रकरणाची सुरुवात, मध्य, शेवट व त्याची कारणे अभ्यासण्यासाठी, समजून घेण्यासाठी बरेच संदर्भ ग्रंथ व संशोधन साहित्य लागेल. त्या सर्व गोष्टींचा प्राथमिक अंदाज सदर पुस्तकात संक्षिप्तपणे  रेखाटला आहे. यामुळे वरील घटनांचे इतिवृत्त म्हणून जरी या पुस्तकास पाहिले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही हे पुस्तक नवीन पिढीला जगाच्या औद्योगिक इतिहासाचे ओळख करून देण्यासाठी समर्थनीय आहे असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक तथा सुप्रसिद्ध चित्रकार भ.मा.परसवाळे यांनी येथे केले. संजय टाकळगव्हाणकर लिखीत कोरोना-गुलामगिरीचे नवे पर्व:टाळेबंदी-पर्यावरण रक्षणाचा नवा मार्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हिंगोली येथील राष्ट्रवादी भवनात 24 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर सुधीर सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जेष्ठ कवी विलास वैद्य, सैनिक फेडरेशनचे राज्य कार्याध्यक्ष नारायण अंकुशे, महात्मा जोतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, जि. प. सदस्य संजय दराडे, डॉ.एम.आर.क्यातमवार,कुंडलीक निर्मले, अॅड. सुकेशिनी ढवळे आणि भुषण स्वामी आदी उपस्थित होते. कोरोना या जागतिक संसर्गाचे भय उभे करून लादण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे जगभरात सर्वसामान्यांच्या मुलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करुन जागतीक सत्ता व अर्थकेंद्रे मुठभरांच्या हातात एकवटली जात असल्याने हे जागतिक स्थितंतर अत्यंत साध्या व सोप्या भाषेत लेखक संजय टाकळगव्हाणकर यांनी प्रस्तुत पुस्तकात मांडले आहे,असेही भ. मा. परसवाळे यांनी पुढे बोलतांना सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले की, या पुस्तकात जागतिकीकरणाच्या रेट्यात देशासमोर अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असून राजकीय नेतृत्व हे हतबल झाल्याचे दिसून येते. हि बाब पुस्तकातील काही भाग वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवते. या पुस्तकावर देश स्तरावर विचारमंथन होणे गरजेचे आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सोळंके तर आभार प्रदर्शन मुरलीधर जायभाये यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुरलीधर गोडबोले, अशोक पवार, वामन टाकळगव्हाणकर, गुणाजी नलगे, गंगाप्रसाद भिसे, गजानन पायघन, विठ्ठल कानोडे आदींनी परिश्रम घेतले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close