Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राठोड यांनी सोडलं मौन, म्हणाले…चौकशीतून जे समोर येईल, ते बघा…;

वाशिम : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड वाशिममधील पोहरादेवी गडावर पोहोचले. जवळपास 15 दिवसांनी समोर आल्यानंतर त्यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. “पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan) मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुखी. या प्रकरणात घाणेरडं राजकारण केलं जात आहे. पूजा चव्हाण ही आमच्या समाजातल्या मुलीचा मृत्यू झाला. याचं आम्हाला दु:ख आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत”, असं संजय राठोड म्हणाले

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वन मंत्री संजय राठोड पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. आज त्यांनी पोहरादेवी येथे सहकुटुंब जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर सेवालाल महाराजांचंही दर्शन घेतलं. त्यानंतर राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर राठोड यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

संजय राठोड म्हणाले, “पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूबद्दल आम्हाला दुःख. तिच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि समाज सहभागी आहे. मी ओबीसी समुदायाचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझं राजकीय जीवन उद्धध्वस्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. माध्यमांनी जे दाखवलं, त्यात कोणतंही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस तपास करत आहेत. पण, माझी आणि समाजाबद्दल घाणेरड राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. चौकशीतून जे समोर येईल. ते बघा…,” असं म्हणत संजय राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केलं

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close