Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

आमदार अंबादास दानवे यांची गजानननगर या भागामध्ये पाहणी

आमदार अंबादास दानवे यांची गजानननगर या भागामध्ये पाहणी

औरंगाबाद /mh20live Network

नागरिकांना दिला दिलासा(ता.२१) : गजाजननगर येथील कोरोना कंटेन्मेंट झोन भागात आज जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष भेट देवुन पाहणी केली. या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले होते. या भागात आमदार दानवे यांनी भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला. तुमच्या मदतीला आम्ही आहोत. आम्हाला तुमच्या अडचणी कळवा आम्ही तुमच्या मदतीला येऊ. परंतु तुम्ही लॉकडाऊनचे कठोर पालन करा. तरच कोरोनाचा नायनाट होईल असे जिल्हाप्रमुख तथा आमदार दानवे यांनी गजाजननगर पसिरातील नागरिकांना आवाहन केले.
यावेळी जिल्हाप्रमुख दानवे म्हणाले की, संभाजीनगर शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस मोठे होत चालले आहे. शहरातील निम्यापेक्षा जास्त भागाला कन्टेमेंटचे स्वरुप आले आहे. यामुळे प्रत्येक भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे परंतु आपण न घाबरता या आजाराशी सामना आपल्या करावयचा आहे आणि कोरोना अद्याप पर्यंत कुठेलेही औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर औषध म्हणुन आपण अशा परिस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंट हा एकमेव उपाय आपल्या सर्वांसमोर आहे आणि फिजिकल डिस्टन्सिंगबरोबच बाहेर पडतांना प्रत्येकांच्या तोंडाला मास्क असेल याची खबरदारी आपण घेण्याची आवश्कता आहे.
यावेळी विधानसभा संघटक तथा नगरसेवक राजू वैद्य, आत्माराम पवार, उपशहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, वामनराव शिंदे, उपविभागप्रमुख दीपक पवार, योगेश नलावडे, ज्ञानेश्वर तुपे, मुकुद सोमदे, अनिल गायके, संदीप मते, लक्ष्मण शर्मा आदिंची उपस्थिती होतीऔरंगाबाद

अभिजीत पगारे
प्रसिद्धिप्रमुख

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close