Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

औरंगाबादेतील समृद्धी महामार्गाच्या कामाची गुणवत्ता तपासणार

 पालकमंत्री सुभाष देसाई येत्या डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष पाहणी करणार

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे काम गुणवत्तापूर्णरित्या दिलेल्या कालावधीत पूर्ण करावे. या मार्गावर प्रवाशांसाठी सर्व आवश्यक सुविधा, नागरी सुविधा केंद्रे उपलब्ध करुन द्यावेत, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरूवारी दि.29 संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. या कामाची प्रगती आणि गुणवत्तेची स्वतः आगामी डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत पालकमंत्री देसाई यांनी घेतला. यावेळी ते म्हणाले की, समृद्धी महामार्गामूळे कमी वेळात मोठे अंतर गाठणे प्रवाशांना शक्य होणार आहे. त्यादृष्टीने या महामार्गाचे काम गुणवत्तापूर्णरित्या विहीत कालमर्यादेत पूर्ण करावे. त्याठिकाणी प्रवाशांसाठी सर्व आवश्यक सुविधा, नागरी सुविधा केंद्र उपलब्ध करुन द्यावे. या कामाच्या प्रगतीची आणि गुणवत्तेची आपण स्वतः डिसेंबर महिन्यात पाहणी करणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून जाणार्‍या या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 112 किलोमिटर असून रुंदी 120 मीटर आहे. शेंद्रा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंज टोल प्लाझा असणार आहे. येथे नागरिकांना या महामार्गावर प्रवेश करता येईल व बाहेर येता येईल. हा महामार्ग सहा लेनमध्ये असून यावर वाहनांना 150 किलोमीटर वेग मर्यादा असेल. महामार्गावर 50 किलोमीटरच्या अंतरावर नागरी सुविधा केंद्रही असतील. 1 मे 2021 रोजी नागपूर ते नाशिक महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्याचे नियोजित अशी माति एमएसआरडीसीचे अधिकारी साळुंखे यांनी बैठकीत दिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close