Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

संभाजीनगर’ आमच्या हृदयात.. ‘त्या’ बॅनरबाजीवरून औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना -मनसेत जुंपली

मुंबई : औरंगाबाद शहराच्या नामकरणावरून आता मनसे आक्रमक झाली आहे. ‘प्रजासत्ताक दिनापर्यंत औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करा नाहीतर…, असे बॅनर मनसेकडून ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. यावरून आता शिवसेनेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचलं आहे.


शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परबम्हणाले, औरंगाबाद शहरातील मनसेची बॅनरबाजी ही निवडणुकीच्या तोंडावर सुरु आहे. मनसेच्या होर्डिंगवर ‘नाहीतर’ असं लिहिलेले आहे. असे अनेक ‘नाहीतर’ आम्ही पाहिले आहेत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर या वादावरून कालपर्यंत एमआयएम आणि शिवसेनेने आपली राजकीय पोळी भाजली त्यांची पोळी चांगली भाजल्याचं पाहून आता मनसेच्याही मनामध्ये उमाळे दाटून येऊ लागले आहेत. त्यामुळे या वादामध्ये आता मनसेने उडी घेतली आहे मात्र येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये या हाच मुद्दा हातात घेतल्यामुळे मनसेला किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसेच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेचं प्रत्युत्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असा धमकीवजा बोर्ड लावल्यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर हे आमच्या हृदयात आहे. आम्ही मनसेच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

‘तुमच्या मनात आहे ते प्रत्यक्षात का उतरत नाही?’
अनिल परब यांच्या टीकेलाही मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर जर तुमच्या मनात आहे तर ते प्रत्यक्षात का उतरवत नाही. आता तर तुमचा थेट मुख्यमंत्रीच आहे. त्यामुळे शहराचं नाव बदला. जेणेकरून औरंगाबादच्या जनतेला आनंद होईल. मात्र तुमच्याकडून सातत्याने औरंगाबादकरांची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसेने केला.

भाजपची भूमिका काय?
कोरोना संकटापूर्वी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी भाजपने शहराच्या नामांतरचा मुद्दा उचलून धरला होता. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचे अनेक दौरेही केले होते.
औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल असून त्याला गती देऊन शहराचे नाव बदललेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close