Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

‘संभाजीराजे अर्धवटच बोलले, पूर्ण बोलले नाही’, विजय वडेट्टीवारांचे स्पष्टीकरण

मुंबई – तलवारीच्या वक्तव्यानंतर आता संभाजीराजे भोसले आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. ‘तुम्ही ओबीसीमध्ये का येत नाहीत?’ अशी विचारणा केल्याचा दावा संभाजीराजे भोसले यांनी केला होता. संभाजीराजे यांच्या या दाव्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘संभाजीराजे अर्धवटच बोलले, पूर्ण बोलले नाहीत. त्यामुळे मला खेद वाटतो. माझ्या वक्तव्याचा अर्थ संभाजीराजेंनी काय घेतला किंवा त्यांचा काय गैरसमज झाला हे मला माहित नाही. माझं वक्तव्य माझं बोलणं स्पष्ट होतं. आम्ही मराठा समाजाच्या मुलांच्या नुकसानीच्या आड येत नाही, असं आम्ही वारंवार सांगत आहोत. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या दिमतीला बहुजन समाजच होता. राजांची भूमिका एककल्ली असू नये. ते छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत. शाहू महाराजांनी शोषित, गरिबांसाठी आरक्षणाची तजवीज केली. त्यांचा वंशज केवळ मराठा समाजाच्या समाजाबाबत वक्तव्य करत आहेत, असा संदेश जावू नये, हे राज्याच्या हिताच्या दृष्टी योग्य नाही. आमची भूमिका ही मराठ्यांच्या मराठा समाजाच्या विरोधात आहे. असेही चित्र रंगवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती, की आम्हाला आमच्या आरक्षणाला धक्का न लागू देता तुम्हाला ओबीसीत यायचे असेल तर वेगळे मागा, त्याचा संवर्ग वेगळा करा. असे मी राजेंना बोललो मात्र ते अर्धवटच बोलले, पूर्ण बोलले नाही.’ असे वडेट्टीवार म्हणाले.

काय म्हणाले होते संभाजीराजे…
विजय वडेट्टीवार यांच्यामुळे मी दु:खी आहे. ओबीसीमधून आरक्षण नको हे मी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. विजय वडेट्टीवार मला म्हणाले होते, की ओबीसीमधून आरक्षण देण्यास तयार आहे. मी त्यांना असे करु नका अशी विनंती केली. वडेट्टीवार असे का वागत आहेत, माहित नाही.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close