Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

समाजवादी व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

संभाजीनगर- शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन विविध पक्षातील व सामाजिक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादासजी दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यात समाजवादी पार्टी अल्पसंख्याक शहरअध्यक्ष अब्दुल रहीम ,समाजवादी पार्टी विकलांग शहर अध्यक्ष परवेज खान ,बीजेपी प्रदेश अल्पसंख्याक युवा उपाध्यक्ष शेख अमजद, सामाजिक कार्यकर्ते शेख हबीब ,नोमान खान , याप्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असून याप्रसंगी प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पक्ष संघटन कार्य व संघटना मजबूती करण्यासाठी एकनिष्ठ राहून विशेष अहोरात्र मेहनत घेऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडण्याचा व तळागाळापर्यंत शिवसेनेचे कार्य पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा संघटक सलिम कुरेशी कामगार यूनियनचे दिलिप म्हस्के , सलीम शाहा, हातगाडी संघटनेचे शेख खालेद , शिवसेना अपसंख्यक आघाडीचे अशफाक पठान हाजी महेबुब खान ,सय्यद इरफान आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close