Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

लॉकडाऊन काळात बंद असलेल्या सलून दुकानांना ,विमा संरक्षण , दरमहा 10 हजारांची मदत करा

सोशल मीडियावर महिलांविषयी अपशब्द वापरणा-यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी

सिल्लोड /mh20live Network

लॉकडाऊन काळात बंद असलेल्या सलून दुकानांना चालू करणे , विमा संरक्षण , दरमहा 10 हजारांची मदत ,विजबिल आणि दुकान भाडे माफ करणे तसेच सोशल मीडियावर नाभिक महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणा-यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद व्हावा आदी मागण्यांसाठी आज सिल्लोड तालुक्यातील नाभिक समाज बांधव आणि महिलांनी दोन ठिकाणी बसून मूक आंदोलने केली. लॉक डाऊन नंतर राज्यातील बहुतांशी व्यावसायांना सरकारने सुरू करण्याची परवानगी दिली पण हातावर पोट असलेल्या सलून मालक आणि कारागीर यांच्या दुकानांना परवानगी न दिल्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली असल्याने समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येत विविध स्वरूपात आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथे मूक धरणे आंदोलन होते. या आंदोलन प्रसंगी सलून साहित्य , मागण्यांची पोस्टर घेऊन तसेच काळ्या फिती बांधून  आणि सुरक्षित अंतर ठेवून नाभिक बांधव सिल्लोड तहसीलसमोर बसले होते. तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी आंदोलांकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन स्वीकारले.
 नाभिक महिलांचे आंदोलन
सोशल मिडीयावरील एका पोस्ट मध्ये नाभिक समाजाच्या महिलांच्या बाबतीत अत्यंत लज्जास्पद कॉमेंट करून अपमानित करणा-या बुलढाणा जिल्ह्यातील लांबे यांच्यावर विनयभंगासह इतर गुन्हे दाखल करून अटक करावी या मागण्यांसाठी तालुक्यातील नाभिक समाजाच्या महिला सिल्लोड शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देऊन बसल्या होत्या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक नालंदा लांडगे तर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी अर्ज स्वीकारून पुढील कार्यवाही ही सायबर क्राईम विभागाकडे तपासासाठी पाठवून देऊ आणि त्यानंतर आलेल्या अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन संपन्न झाले.
या दोन्ही आंदोलनासाठी नाभिक समाजाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी , कार्यकर्ते , सलून बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close