Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

पगार ७० हजार, शिक्षण १० वी, १२ वी आणि नोकरी थेट सरकारी; ‘या’ ठिकाणी करा अर्ज!

पगार ७० हजार, शिक्षण १० वी, १२ वी आणि नोकरी थेट सरकारी; ‘या’ ठिकाणी करा अर्ज!

मुंबई | सरकारी नोकरीची भुरळ अनेकांना असते. ठराविक वेळेचे काम, भरघोस पगार आणि सुरक्षित भविष्याची शाश्वती यामुळेही अनेकजण सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतात. या सर्वांसाठी नोकरीची चांगली संधी असून भारतीय टपाल खात्याद्वारे महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये मोठी भरती केली जाणार आहे.

टपाल खात्याने पोस्टमनसह विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पोस्टमन, मल्टी टास्किंग स्टाफ आणि मेल गार्ड पदांसाठी ही भरती होत आहे. सोमवार ५ ऑक्टोबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून ३ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही मोठी सुवर्णसंधी आहे. टपाल खात्याच्या https://www.maharashtrapost.gov.in/अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

पद आणि पदांची संख्या – 
पोस्टमन (PM) – १,०२९ पदे
मेल गार्ड (MG) – १५ पदे
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदे
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) – २९५ पदे
एकूण पदे – १,३७१

वयोमर्यादा
टपाल खात्यातील पदांसाठी सर्वसाधारणपणे १८ ते २७ वर्ष वयोमर्यादा आहे. यापैकी पोस्टमन आणि मेल गार्डची वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे, मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे आहे. SC/ST/PWD प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत आहे.

पात्रता –
– मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. 
– मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण.
– मराठी भाषेचे ज्ञान, दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून हवे.
– संगणकाचे ज्ञान आवश्यक. 
– पेपर ३ हा संगणकावर डेटा एन्ट्रीचे कौशल्य पाहणारा असेल.
– पोस्टमन पदांसाठी दुचाकीचा वाहन परवाना आवश्यक. परवाना नसल्यास दोन वर्षे मुदतीत तो मिळवण्याची अट. दिव्यांगांना सवलत.

निवड प्रक्रिया – 
टपाल खात्यातील पदांसाठी निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे होणार आहे. २०० गुणांची ऑनलाइन टेस्ट घेतली जाणार आहे. 
– पेपर १ हा १०० गुण 
– पेपर २ आणि ३ अनुक्रमे ६० आणि ४० गुण
पेपर १ साठी ९० मिनिटांचा कालावधी, पेपर २ साठी ४५ मिनिटे आणि पेपर ३ साठी २० मिनिटे कालावधीची असेल. 
पेपर ३ ही संगणक आधारित टेस्ट असेल. सिलॅबसबाबतची माहिती नोटिफिकेशनमध्ये सविस्तरपणे देण्यात आली आहे. (पान क्र. ११ ते १३). 
उमेदवारांनी अर्ज भरतानाच परीक्षा केंद्राचा कोडही नमूद करायचा आहे. राज्यात एकूण २५ परीक्षा केंद्रे असून त्यांचे कोड नोटिफिकेशनमध्ये (पान क्र. २४) देण्यात आले आहेत.

शुल्क – 
अर्जाचे शुल्क प्रति पोस्ट – १०० रुपये ऑनलाइन अर्जासाठी 
परिक्षा फी –  ४०० रुपये असे एकूण ५०० रुपये शुल्क आहे. 
आरक्षित प्रवर्ग आणि महिलांसाठी परीक्षा शुल्क माफ आहे.

वेतनश्रेणी
पोस्टमन / मेल गार्ड – वेतनश्रेणी – ३ (२१,७०० ते ६९,१०० रुपये.)
मल्टी टास्किंग स्टाफ – वेतनश्रेणी – १ (१८,००० ते ५६,९००)

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close