Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

“सख्खे शेजारी” कलर्स मराठीवर ! ११ जानेवारीपासून

 एक हक्काचं घरं, आधाराचा हात आणि एक हाक देताच मदतीला धावून येणारा शेजारी लाभण म्हणजे भाग्यच. असं म्हणतात, ‘कोसो दूर असलेल्या नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा’. अडीअडचणीच्या काळात आपल्याला पहिल्याप्रथम आठवतो तो शेजारीच… सुखाच्या क्षणी ते आपल्यासोबत कायम असतात, दु:खात खंबीरपणे आपली साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला आपले सख्खे वाटतात…. आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमध्ये दुरावा येत चालला आहे, रक्ताची माणसं भेटत नाही, पण हक्काचा शेजारी लगेच धावून येतो. नातेवाईक सणासुदीला येतात पण रोज संबंध  येतो तो शेजार्‍यांशी म्हणूनच त्यांच्याशी एक जवळचं, आपुलकीचं नातं तयार होतं. काही शेजा-यांशी आपले घरचे ऋणानुबंध जोडले जातात आणि म्हणूनच आपण त्यांना ‘सख्खे शेजारी” म्हणतो… अशाच आपल्या जवळच्या शेजारी कुटुंबांसोबत रंगणार आहेत लय भारी गप्पा, जेव्हा घरी येणार ‘सख्खे शेजारी’… रक्ताचं नातं नसलं तरी एक ‘हक्काचं’, ‘माणूसकी’चं नातं चिरंतन टिकवून ठेवणाऱ्या शेजारधर्माचा सन्मान करणारा शेजारोत्सव म्हणजेच हा कार्यक्रम…आपण आपल्या जीवाभावाच्या शेजार्‍याला किती ओळखतो, त्यांच्याबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आणि याच शेजार्‍यांसोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी कलर्स मराठी टेलिव्हीनजनवर पहिल्यांदाच घेऊन येत आहे एक धम्माल शो ‘सख्खे शेजारी’ ११ जानेवारीपासून सोम – शनि संध्या ६.३० वा. महाराष्ट्राचा लाडका कलाकार चिन्मय उदगीरकर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. कार्यक्रमाची निर्मिती OMG ऑफबीट मीडिया गाईड ही संस्था करणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close