Subscribe to our Newsletter
Loading
क्राईममराठवाडा

पैसे,अन्नधान्य लुटण्यासाठी मठात घुसून साधूंची हत्त्या नांदेड जिल्ह्यातील थरारक घटना

नांदेड/mh20live Newtork
कोरोनामुळे माणसे हळूहळू पिसाटतील.हाताला काम आणि पोटात भाकरी नसलेले लोक एकमेकांच्या जीवावर उठतील.असे म्हटले जात असताना त्याचा प्रत्यय देणारी थरारक घटना नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या नागठाणा बु. येथे घडली आहे.येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री दीड वाजताच्या सुमारास गावातीलच एका माथेफिरू तरुणाने गळा दाबून खून केला . या घटनेने भाविकात एकच खळबळ उडाली आहे. महाराजांच्या मठात प्रवेश करून त्या माथेफिरूने त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि त्यानंतर त्यांचा खून केला.घटने नंतर महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. या घटनेनंतर लगेच महाराजांचे प्रेत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. महाराजांचा खून झाल्याची माहिती भाविकांना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला असून मयताचे नाव भगवान शिंदे रा. चिंचाळा ता. उमरी असे असल्याचे समजते. शिंदे हे मठापतीचे सेवेकरी होते. सेवेकरीचाही खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. भगवान शिंदे हा आरोपी सोबत होता की मठातील सेवेकरी होता, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. याबाबत पोलिस अधिक माहिती घेत आहेत.माठातील पैसे आणि अन्न धान्य चोरी करण्यासाठी हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close