Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

‘वारीत साप सोडण्याची अफवा करणारे म्हणतात मंदिर उघडा शिवसेनेचे युवा नेते कृष्णा मापारी यांचा भाजपवर हल्लाबोल


पैठण / किरण काळे

 शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या पंढरपूरच्या वारीमध्ये साप सोडला जाणार, चेंगरा चेंगरी होणार अशी अफवा उठऊन पंढरीची वारी खंडित करण्याचा डाव ज्या भारतीय जनता पार्टीने आखला,आज तीच भाजपा कोरोनाच्या महामारीत मंदिरे उघडावी म्हणून शासनाच्या विरोधात घंटा नाद आंदोलन करत आहे. त्यामुळे यांचा निषेध करावा तितका कमी असल्याचे मत शिवसेनचे युवानेते कृष्णा मापारी यांनी व्यक्त केले.या बाबत सविस्तर बोलताना श्री कृष्णा मापारी म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये आषाढी वारीला येण्यासाठी जनतेने रोखले होते. त्यावेळी त्यांनी वारीत साप सुटणार आहे, चेंगरा चेंगरी होईल त्यामुळे वारीला येणार नसल्याचा कांगावा त्यांनी केला होता. शेकडो वर्षाच्या वारीच्या परंपरेला आतापर्यंत कधीही गालबोट लागले नसताना त्यांनी आशा शब्दाचा वापर केला होता. आता तीच भारतीय जनता पार्टी ठाकरे सरकारने मंदिर उघडावे म्हणून बनावट आंदोलन करत आहे, हा त्यांचा बेगडीपणा आहे.वास्तविक मंदिरे हा प्रत्येकाचा आस्थेचा विषय आहे. आणि ती उघडली पाहिजेत या बाबत शासन सकारात्मक आहे. देवदर्शनासाठी कानाकोपऱ्यातून लोक येतात मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भाविक भोळा भाव घेऊन येत असतो. कोरोनाच्या महामारीत योग्य अंतर पाळले गेले नाही, गर्दी जमली तर संसर्गाचा धोका जादा निर्माण होऊ शकतो. अजूनही कोरोनावर औषध तयार नाही हे माहिती असताना अडमुठेपणाची भूमिका भाजपा करीत असल्याचे मत सेनेचे कृष्णा मापारी यांनी व्यक्त केले.भाजप राज्य सरकारची जाणीवपूर्वक बदनामी करत आहे. भाजपचे पदाधिकारी आंदोलने करून राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. त्यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध अशा शब्दात कृष्णा मापारी यांनी भाजपचा आंदोलनाचा समाचार घेतला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close