Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

काराचीवाला ऑटोमोटिव्ह मध्ये रॉयल एन्फिल्डची ‘ मेटीओर’ लॉन्च

स्मार्ट फिचर्स असलेल्या रॉयल एन्फिल्डसाठी चाहत्यांची बुकींगसाठी झुंबड

वाळूज महानगर : ‘मेड लाईक अ गन, गोज् लाईक अ बुलेट’ अशा भारदस्त वाक्यात महत्ती सांगितली जाते त्या रॉयल एन्फिल्डने आता ‘ मेटीओर ३५०’ नावाची नवी बुलेट लॉन्च केली आहे. औरंगाबादमधल्या वाळूज परिसरातल्या काराचीवाला ऑटोमोटिव्ह मध्ये रॉयल एन्फिल्डच्या नव्या बुलेटचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे अनावरण करणारे पाहुणे नव्या व्हर्जनच्या एवढे प्रेमात पडले की त्यांनी पहिले बुकींग स्वत:च्या नावाने करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
पंढरपूर परिसरातल्या काराचीवाला ऑटोमोटिव्ह चा परिसर शुक्रवारी सकाळी रॉयल एन्फिल्डच्या चाहत्यांनी भरला होता. आधुनिक बाईक्सच्या युगातही रॉयल एन्फिल्डने टिकवून ठेवलेली ब्र्रांड व्हॅल्यू या गर्दीवरुन सर्वांनाच समजून आली. असिस्टंट आरटीओ एकनाथ बगाळे यांच्या हस्ते ‘ मेटीओर ३५०’ चे अनावरण करण्यात आले. थक्क करणारा नवा लूक पाहून स्वत: एकनाथ बगाळे हरखून गेले. या कार्यक्रमाला एयू बॅंकेचे शाखा व्यवस्थापक गणेश गजमल, शिवसेना नेते संतोष मरमट, काराचीवाला ऑटोमोटिव्हचे डायरेक्टर सागर कराचीवाला, व्यवस्थापक विजय पडवळकर, विक्री व्यवस्थापक गणेश सोनवणे, सर्व्हिस व्यवस्थापक सचिन पोटे आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. ‘ मेटीओर ३५०’ ही क्रूझर बाईक म्हणून ओळखली जाते. नव्या बुलेटमध्ये अत्याधुनिक अशी यंत्रणा देण्यात आली आहे. फायरबॉल, सुपरनोव्हा, स्टेलर अशी अवकाशीय नांवे आणि संज्ञा वापरुन रॉयल एन्फिल्डने नवी बुलेट लॉन्च केली आहे.
काराचीवाला ऑटोमोटिव्ह मध्ये सकाळच्या सुमारास नवी बुलेट हाताळण्यासाठी तसेच तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी चाहत्यांची चांगलीच गर्दी जमली होती. टेस्ट डाईव्हसाठी तरुणांचे घोळके येत होते. अनेकजणांनी तर लॉंचिंगचीच वाट पहात असल्याचे सांगून बुकींगच्या तयारीत असल्याचे सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close