Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पेण परिवहन कार्यालयाच्या वतीने शिकाऊ वाहनचालकांसाठी मुरुड येथे रस्ता सुरक्षा अभियान उपक्रम संपन्न

अलिबाग,जि.रायगड, :- परिवहन कार्यालय, पेण (रायगड) च्या वतीने दि.20 जानेवारी रोजी मुरुड येथील शिबीर कॅम्प येथे शिकाऊ अनुज्ञप्ती आणि वाहनचालक चाचणीसाठी आलेल्या अर्जदारांना मोटार वाहन निरीक्षक यांनी 32 वे रस्ता सुरक्षा अभियान 2021 च्या निमित्ताने माहितीपत्रके वाटली. तसेच वाहतूक नियमांचे महत्व विषद करणारे व्याख्यान आयोजित केले. 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे घोषवाक्य “सडक सुरक्षा जीवन रक्षा” असे असून सडक सुरक्षा जीवन रक्षा हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे व सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे ,याबद्दल मोटार वाहन निरीक्षक श्री. किरण पाटील व श्री. दिपक कोकणे यांनी मार्गदर्शन केले. मोटार वाहन निरीक्षक श्री.पाटील व कोकणे यांनी यावेळी वाहतूक नियमांची व चिन्हांची माहिती असलेली माहितीपत्रके वाटली. तसेच “जीवनदूत’ म्हणून कार्य करणे आवश्यक आहे, याबाबतचे महत्व विषद केले. विशेषतः अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली.

 
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close