Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादमहाराष्ट्र

औरंगाबाद ,शहर परिसरात पूर्वमोसमी पावसाच्या सरी !

शहर परिसरात पूर्वमोसमी पावसाच्या सरी ! औरंगाबाद/mh20live
मान्सून सोमवारी (१ जून ) केरळमध्ये दखल होत असून, २ जूनला कोकण गोवा भागात येईल आणि पुढील २४ ते ४८ तासात मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ३ ते ४ जूनपर्यंत दाखल होणार आहे. दरम्यान, रविवारी (३१ मे) शहर परिसरात अनेक ठिकाणी वादळवार्यांसह पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेला पाऊस उशिरापर्यंत पडत होता. यामुळे हवेत गारवा पसरल्यामुळे उष्णतेपासून सुटका झाली. दरम्यान शहराचे रविवारचे कमाल तापमान ३९.८ तर किमान २६.५ अंश सेल्सिअस नोंदवल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेतून देण्यात आली.
मान्सून ३० मे रोजी बंगालच्या उपसागरातून केरळच्या दिशेने ताशी ६०ते ६५ किमी. वेगाने निघाला असून, तो सोमवारी पहाटे केरळ काबीज करणार आहे. तेथून त्याच वेगाने महाराष्ट्रात प्रथम कोकणात २ जून रोजी तर गुजरातेत ३ जूनला दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रविवारी गुलमंडीसह औरंगपुरा, सिडको-हडको, हर्सूल, मिटमिटा, पडेगाव, छावणी, बेगमपुरा, विद्यापीठ, शहागंज, शिवाजीनगर, गारखेडा परिसर, मुकुंदवाडी, चिकलठाणा आदी भागांत पाऊस पडल्याचे व्रुत्त आहे. कमालीच्या उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, विजेच्या लपंडावाने जनजीवन हैराण झाले. 0 ३ पासून मान्सून मराठवाड्यात अरबी समुद्रात मान्सूनला अतिशय पोषक वातावरण यंदा २९मे रोजीच तयार झाले. त्यामुळे मान्सून यंदा केरळात चार दिवस आधी तर महाराष्ट्रात पाच दिवस आधीच दाखल होत आहे. बंगालचा उपसागर, ओमान, लक्षद्वीप, केरळ भागात तुफान पाऊस सुरु झाला असून मान्सूनने वेग धरला आहे. मान्सून २ जूनला कोकणात आल्यावर पुढील २४ ते ४८ तासांत म्हणजे ३ते ४जून पर्यंत तो मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ काबीज करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close