Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

महसूली जमा आता एका क्लिकवर, ग्रास महाकोष महाराष्ट्र मोबाईल ॲप उपलब्ध

           मुंबई, : संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे (NIC) यांचे मार्फत विकसित केलेल्या महसूली कर व करेतर रकमा भरण्याची सुविधा देणारे, “gras mahakosh maharashtra” या Android Mobile App चे वित्त विभाग, अपर मुख्य सचिव श्री मनोज सौनिक यांच्या हस्ते दि.04 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आले.

            महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हयातील कोणत्याही विभागाशी संबंधित करदाते, इतर संस्था, शासकीय कार्यालये तसेच सर्वसामान्य नागरिक देखील २४X७ या ग्रास ॲपचा वापर करुन शासन खाती रक्कम जमा करू शकतात.

            हे ॲप GRAS वेबसाईट व गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. NIC SCIENTIFIC OFFICER श्री. बालकृष्ण नायर व त्यांचे सहयोगी विशाल नळदुर्गकर यांचा ॲप विकसित करण्यात मोलाचा वाटा आहे.

देयकांचे आदान-प्रदान, कर व करेतर रकमा व इतर बहुतांशी कामकाज आँनलाईन पध्दतीने करण्यात येत असलेल्या संचालनालय, लेखा व कोषागारे या विभागात GRAS मोबाईल अँपचे विकसन हा महत्त्वपुर्ण टप्पा ठरल्यामुळे वित्त विभागातील सर्व अधिका-यांनी याबद्दल या प्रसंगी आनंद व्यक्त केला.

            नवीन निवृत्ती वेतनधारकांना त्वरित PRAN क्रमांक व PRAN कार्ड ऑनलाईन मिळण्याकरिता ONLINE PRAN GENERATION MODULE (OPGM) हे सेवार्थ प्रणालीसोबत संलग्न करण्यात आले. सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, नियंत्रक अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी यांना तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांना  सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे वेतन पडताळणी मार्गदर्शिका पु‍स्तक यावेळी प्रकाशित करण्यांत आले.

            या व्यतिरिक्त अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालयाकडून देयकांना लावण्यांत येणा-या महत्त्वाच्या आक्षेपांची माहिती करून घेऊन आक्षेप लागू नयेत याबाबतची परिपूर्ण व अद्ययावत माहिती देणारे देयक वेळीच कशी पारित होतील ? याबाबत मार्गदर्शक ठरेल असे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.

            ही पुस्तके PDF स्वरुपात संचालनालयाच्या “महाकोष” या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यांत आलेली आहेत.

            यावेळी प्रधान सचिव (ले व को) श्री. नितीन गद्रे,  प्रधान सचिव ( वित्तीय सुधारणा ) श्री. राजगोपाल देवरा व सचिव (व्यय ) श्री. राजीव मित्तल  उपस्थित होते.

तसेच संचालनालय, लेखा व कोषागारे कार्यालयातील श्री.ज.र.मेनन (संचालक),  श्री.जि.रा.इंगळे (सहसंचालक), श्री.विनोद शिंगटे (उपसंचालक), श्रीम. प्रगती धनावडे (सहाय्यक संचालक) व श्रीम.चित्रलेखा खातू (सहाय्यक संचालक) उपस्थित होते.

            संचालक, लेखा व कोषागारे श्री.ज.र.मेनन यांनी सर्व नागरिकांनी  सर्व प्रकारच्या कर व करेतर रकमा जमा करण्यासाठी gras mahakosh Maharashtra या मोबाईल ॲपचा तसेच इतर सर्व सुविधांचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन केलेले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close