Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर 58 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी

औरंगाबाद : तालूक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत मंगळवार, 8 डिसेम्बर रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र, हडको येथे सकाळी 11 वाजता विशेष बैठकीत काढण्यात आली. रश्मी संतुके या पाच वर्षाच्या मुलीच्या हाताने चिठ्ठ्या काढून सोडत काढण्यात आली. 114 ग्रामपंचायतींपैकी 58 सरपंचपदे महिलांच्या वाट्याला आलेली आहेत तर 20 सरपंचपदे अनुसूचित जातीच्या पुरूष व महिलेसाठी आणि खुल्या प्रवर्गातील महिला व पुरूषांसाठी 60 सरपंचपदे वाट्याला आली आहेत.

अनुसूचित जातीसाठी सय्यदपुर, औरंगपुर, कचनेर, कचनेर तांडा, सुलतानपुर, हिरापुर, कच्चीघाटी, जावतपुर, नायगाव, भिकापुर, पटोदा, गंगापुर नेहरी, लामकाना, जयपुर, चौका, चौकावाडी, दरकवाडी, हातमळी, रूस्तमपुर, डोणवाडा, बोरवाडी, बोरवाडी तांडा, कौडगाव अंबड, पळशी, टाकळीमाळी, महमदपुर एकलहरा, हुसेनपुर, मलकापुर, लाडसावंगी, भोगलवाडी, बकापुर, गोपाळपुर, सहाजतपुर, करजगाव, हसनाबादवाडी, आडगाव खुर्द, गाडीवाट, गाडीवाट तांडा या गावांची निवड झाली आहे. अनुसूचित जाती (महिला) आरक्षणासाठी कचनेर, कचनेरतांडा, जयपुर, लामकाना, लाडसावंगी, भोगलवाडी, टाकळीमाळी, महामदपुर, एकलहरा, हुसेनपुर, मलकापुर, पळशी, सय्यदपुर, औरंगपुर, करजगाव, हसनाबादवाडी, डोणवाडा, बोरवाडी, बोरवाडी तांडा, दरकवाडी ही गावे निघाली. अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी तालुक्यातील केसापुरी, रामपुरी, केसापुरी तांडा, आडगाव (बुद्रूक), आपतगाव ही गावे तर अनुसूचित जमाती महिलेसाठी केसापुरी, रामपुरी, रामपुरी तांडा व आपतगाव गावांची निवड झाली आहे.

प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण याप्रमाणे
औरंगाबाद तालूक्यातील प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण याप्रमाणे राहिले आहे. अनुसूचित जातीसाठी 10 गावे, अनुसूचित जाती ( महिला) साठी 10 गावे, अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जमाती (महिला) साठी 2, नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)साठी 15, नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला)साठी 16, सर्वसाधारणसाठी 30 आणि सर्वसाधारण महिलांसाठी 30 गावांची निवड झाली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close