Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पैठण तालुक्यातील १०८ गावांच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर- वाचा सविस्तरपैठण / किरण काळे

इतर निवडणूकासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या पैठण तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या साल २०२० ते २०२५ या पाच वर्षासाठी सरपंच पदाचे आरक्षण शेकडो गावकऱ्यांच्या साक्षीने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून काढण्यात आले.सरपंच पदासाठी बहुतांश गावात महिलेला संधी मिळत असल्याने आनंदाचे वातावरणात आहे. तसेच देव पाण्यात ठेऊन बसलेल्या पुढाऱ्यांच्या सरपंच पदाच्या जागा वेगळ्यास प्रवर्गासाठी सुटल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

राज्य निवडणूक आयोग तसेच जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसील कार्यालयात तालुक्यातील १०८ गावांच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले ते म्हारोळा सर्व साधारण, ईमामपूर सर्व साधारण, पैठणखेडा अनुसूचित जाती, सोमपुरी सर्व साधारण महिला, ब्राम्हणगाव सर्व साधारण, एकतुनी अनुसूचित जाती, दभारुळ नागरिकांचा मागास प्रवर्ग, आंतरवाली खंडी सर्व साधारण, कडेठाण खुर्द सर्व साधारण महिला, बाभूळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पारुंडी नागरिकांचा मागास प्रवर्ग, पारुंडी तांडा सर्व साधारण महिला, दरेगाव सर्व साधारण महिला, डोनगाव सर्व साधारण, खेर्डा सर्व साधारण, कौदर कुतुबखेडा सर्व साधारण, सोनवाडी बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग,हर्षी बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, दादेगाव बुद्रुक सर्व साधारण, पांगरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पाडली गाझीपूर अनुसूचित जाती महिला, नीलजगाव सर्व साधारण महिला, गेवराई बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कारकीन सर्व साधारण, नांदलगाव अनुसूचित जाती महिला, मावसगव्हाण सर्व साधारण महिला, तोंडोली नागरिकांचा मागास प्रवर्ग, गाडेगाव पैठण इंदेगाव ब्रम्हगाव सर्व साधारण, विहामंडवा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, टाकळी अंबड अनुसूचित जाती महिला, आवडे उचेंगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, आपेगाव आनंदपूर सर्व साधारण महिला,सोलनापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,रहाटगाव सर्व साधारण, चांगतपुरी सर्व साधारण महिला, तांदूळवाडी ओबीसी महिला, पिंपळवाडी पचालगाव सर्व साधारण महिला, वाहेगाव सर्व साधारण महिला, ढाकेफळ अनुसूचित जमाती महिला, वडजी सर्व साधारण,थेरगाव कोळी बोडखा बालानगर सर्व साधारण महिला, मुरमा केकतजळगांव लाखेगाव ७४ जळगाव पाचोड बुद्रुक सर्व साधारण, लिमगाव ओबीसी,पाचोड खुर्द अनुसूचित जाती महिला, आडगाव जावळे नवगाव लोहगाव शेवता बिडकीन हिरापूर धुपखेडा वरवंडी खुर्द ओबीसी, हिरडपुरी मुलानी वाडगाव खादगाव मूधलवाडी सलावडगाव अनुसूचित जाती महिला, दादेगाव जहांगीर अनुसूचित जमाती, फारोळा कावसन जुने ढोरकीन पाटेगाव कापूसवाडी शेकटा बोकुड जळगांव अडुळ बुद्रुक वडवळी सर्व साधारण, चितेगाव दावरवाडी वरुडी बुद्रुक आखदवाडा चणकवाडी कातपूर आलियाबाद तांडा बुद्रुक जांभळी टाकळी पैठण देवगाव धनगाव कुरण पिंप्री सर्व साधारण महिला,हर्षी खुर्द रांजणगाव खुरी अडुळ खुर्द तारू पिंपळवाडी कृष्णापुर नांदर अनुसूचित जाती,ईसरवाडी रजापूर कडेठाण बुद्रुक, घारेगाव कौडगाव नारायणगाव गेवराई बार्शी दिण्णापूर ओबीसी महिला,चिंचाळा अनुसूचित जमाती महिला या प्रमाणे १०८ गावांच्या भावी सरपंच पदाचे आरक्षण तहसील कार्यालयात काढण्यात आले. यावेळी जनार्धन दराडे आदींसह कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close