Subscribe to our Newsletter
मराठवाडा

जालना:आवश्यक श्रेणीमध्ये ऑप्टीकल दुकानांचा समावेश जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी


जालना, दि. 16 :- जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रविंद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 अन्वये प्राप्त अधिकारान्वये जालना जिल्हयात यापूर्वी दि. 14 एप्रिल रोजीच्या आदेशातील नमुद उपाययोजना दि.14 एप्रील 2021 रोजीच्या रात्री 8.00 वाजेपासुन ते दि.01 मे 2021 रोजीच्या सकाळी 7.00वाजेपर्यंत लागु करण्यात आलेल्या आहेत. या उपाययोजनांमधील मुदा क्र.2 (1) मध्ये या आदेशान्वये आवश्यक श्रेणीमध्ये ऑप्टीकल दुकानांचा समावेश करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी निर्गमित केले आहेत. तसेच यापूर्वीच्या आदेशामध्ये नमूद सर्व बाबी जशाच्या तशा दि.01 मे 2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत लागू राहतील.
कुठल्याही व्यक्तीकडुन या आदेशातील सूचनाचे उल्लंघन झाल्यास त्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या कलम 51 ते 60 नुसार कारवाई केली जाईल, त्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close