Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

वोक्खार्ट ग्लोबल शाळेमध्ये प्रजासत्तक दिवस साजरा


औरंगाबाद :औरंगाबाद मधील एकमेव आय बी मान्यताप्राप्त शाळा ‘वोक्खार्ट ग्लोबल स्कूल’ मध्ये दि. २६ जानेवारी रोजी ७२ वा प्रजासत्तक दिवस संपन्न झाला. कोरोना संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वे पाळून कार्यक्रम साजरा झाला. या प्रसंगी शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व काही पालक उपस्थित होते. शाळेचे प्रिन्सिपल (मुख्याध्यापक आय बी ) श्री प्रदीप शर्मा ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना श्री प्रदीप शर्मा यांनी स्वातंत्र्यासाठी व लोकशाही स्थापित करण्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे स्मरण केले तसेच देशाची घटना तयार करणार्‍या सदस्यांचा उल्लेख केला. कोरोना काळात बलिदान केलेल्या कोरोनायोद्ध्यांबरोबरच शाळा सामाजिक कार्याला हातभार लावण्यास कटिबद्ध आहे हे ही त्यांनी नमूद केले.

शाळा चालवित असलेल्या ‘आय बी’ च्या तीनही शिक्षण क्रमांचे समन्वयक व प्रमुख सौ. हेतल (पी वाय पी ), श्री मंदार गुर्जर (एम वाय पी ) व श्री निर्मलेन्दू त्रिपाठी (डी पी ) ह्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात श्री मंदार गुर्जर ( एम वाय पी समन्वयक ) यांच्या भाषणाने झाली. सौ. हेतल  (पी वाय पी समन्वयक ) यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close