Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

डिफेन्स करिअर ज्युनियर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

पत्रकार सचिन अंभोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

औरंगाबाद | टीव्ही सेंटर येथील डिफेन्स करिअर ज्युनिअर कॉलेज व डिफेन्स  अकॅडमी  च्या वतीने  ७२ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार सचिन अंभोरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डिफेन्स महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन महाले, एमपीपी च्या संचालिका अर्चना पांडे, डिफेन्स कॉलेज च्या संचालिका वैशाली पाटील, मारुती लष्करे, नितीन पाटील, सचिन ठोकळ यांची उपस्थिती होती.

ध्वजारोहण प्रसंगी बोलतांना  सचिन अंभोरे म्हणाले कि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताला संविधान देऊन सर्वसामान्य माणसाला अधिकार प्रदान केले आहे. त्यामुळे प्रत्येकांनी भारतीय संविधानाचे महत्व लक्षात घेऊन ते अंगिकारले पाहिजे. लोकशाही मजबूत करण्यासाठी संविधानाने युवा मतदारांना १८ व्या वर्षी मतदान करण्याचा अधिकार दिला असल्याने हि मोठी जबाबदारी असून राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आपले कर्तुत्व सिद्ध केले पाहिजे. भारताला सर्वच बाजूने सक्षम आणि सर्वांगीण विकसनशील बनविण्यासाठी युवकांनी आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव ठेवा असे आवाहन यावेळी सचिन अंभोरे यांनी केले. तर डिफेन्स महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन महाले म्हणाले कि, २६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून जरी साजरा केला जात असला तरी हा मोठा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. भारताला खुप कमी वेळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून प्रत्येकाच्या अधिकाराची बांधणी केली आहे. आपल्या आयुष्याच्या जडण घडणीसाठी आणि देशाच्या विकासासाठी आजच्या तरुणाईने आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे. जे काही यश मिळवायचे आहे ते तुम्हालाच मिळवायचे आहे. त्यामुळे आपल्या मनगटावर विश्वास ठेवून प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडावे असे आवाहन यावेळी प्राचार्य सचिन महाले यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डिफेन्स महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारीवृंद तसेच विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close