Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

रेनॉ कायगर नवी, स्मार्ट आणि रोमांचक बी-एसयूव्ही भारतात सादर होत आहे

औरंगाबाद : उत्पादनांसाठीचे प्रबळ धोरण आणि उत्पादनांमध्ये आमूलाग्रनवप्रवर्तन घडवण्यासाठीची वचनबद्धता याचा भाग म्हणून, रेनॉ इंडिया हे रेनॉ कायगर या नव्याउत्पादनाला बाजारपेठेत आणून त्याच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची श्रेणी आणि विभागांचे विस्तारीकरण करतील. या कारच्या माध्यमातून या क्षेत्रातील सर्व खेळच पालटून जातील. ट्रायबरची बांधणी ज्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे, त्याच प्लॅटफॉर्मवर या कारची बांधणी केली जाईल आणि रेनॉ ग्रुपकडून जागतिक स्तरावर ती सादर केली जाईल. रेनॉ कायगर सोबत रेनॉ आपले नवे जागतिक स्तरावरील इंजिनही सादर करणार आहे.

ग्राहकांना रेनॉ कायगर कडून काय अपेक्षित आहे, हे पाहण्यासाठी रेनॉने कायगर शो कार या चे जागतिकअनावरण केले. या प्रदर्शनीय कारच्या संरचनेवरच रेनॉच्या नव्या एसयूव्हीची संरचना आणि विकसन करण्यात आले आहे. रेनॉ कायगर शो कार ही फ्रान्समधील कॉर्पोरेट डिझाईन्स टीम्स आणि रेनॉ इंडिया डिझाईन्स यांच्या सहकार्यातून तयार करण्यात आली आहे. रेनॉच्या अन्य सर्व कारप्रमाणेच रेनॉ कायगर शो कार ची अनोखी आणि आकर्षक संरचना असून, त्यात शहरी आधुनिकता आणि शहराबाहेरही असलेली कार्यक्षमता यांचे दर्शन घडते. रेनॉ कायगर शो कार चा बाह्यरंग आपला पाहण्याचा दृष्टीकोन आणि उजेडावर अवलंबून असतो आणि एखाद्या जादूप्रमाणे निळा आणि जांभळा असा बदलताना दिसतो. कार्यक्षम आणि आटोपशीर असलेली रेनॉ KIGER show car स्पोर्टी अनुभव देते. कारला द्विस्तरीय प्रभावी प्रकाशयोजना आहे.

रेनॉ कायगर तिच्या अनोख्या रचनेमुळे ओळखली जाईल, कायगर शो कार च्या जागतिक स्तरावरील आजच्या अनावरणातून त्याचे प्रत्यंतर येईल. कायगर शो कार ही प्रदर्शनीय कार असून, तिच्यावर रेनॉ कायगर ची बांधणी करण्यात आली आहे. दोघांमध्ये संरचना, बांधणी यांत 80% साम्य आहे. रेनॉ कायगर मध्येविविध स्मार्ट गुणधर्म आणि वैशिष्ट्ये आहेत. त्यातील काही तर या श्रेणीतील सर्वोत्तम आहेत. ते या कारची संरचना आणि बांधणीला पूरक असेच आहेत. रेनॉ कायगर सह रेनॉ पूर्णतः नवे टर्बो इंजिनही बाजारात आणणार असून, त्या माध्यमातून ड्रायव्हिंगचा एक अनोखा आनंद मिळेल. हे इंजिन उच्च दर्जाची कामगिरी करणारे असून, आधुनिक आणि कार्यक्षम इंजिन म्हणून एक उत्तम पर्याय आहे.

भारतातील नव्या उत्पादनांच्या योजनेबद्दल रेनॉ इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम ममिलापल्ली म्हणतात, “रेनॉ कायगर ही आमची पूर्णतः नवी B – एसयूव्ही असून, ग्रुप रेनॉचे ते एक आकर्षक, स्मार्ट आणि उत्साहित करणारे उत्पादन म्हणून ओळखले जाईल. आम्हाला सांगण्यात आनंद होतो की, रेनॉ कायगर जागतिक बाजारपेठेत सर्वप्रथम भारतात उपलब्ध केली जाईल आणि त्यानंतर जगभरातील अन्य बाजारपेठांमध्ये उपलब्ध केली जाईल. क्विड आणि ट्रायबरनंतर रेनॉ कायगर ही तिसरी जागतिक कार आहे जी ग्रुप रेनॉकडून पहिल्यांदा भारतात उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यानंतर अन्य बाजारपेठांमध्ये तिचे आगमन होईल. आमच्या भारतविषयक धोरणाचा भाग म्हणून रेनॉ कायगर ला उत्तम प्रलयकारीनाविन्यपूर्णता घेऊन येईल. ही कार या उद्योगातील वाट्यापैकी 50%पेक्षा अधिक वाटा असलेल्याB – सेगमेंटमध्ये सादरकेलीजाणार आहे. त्यामुळे आम्हाला देशभरात आमचे अस्तित्व अधिक ठळक करता येईल. थोड्याच काळात, रेनॉने भारतात 6,50,000 विक्रीचा महत्त्वाचा टप्पा पार केला असून, पुढेही रेनॉ कायगर सोबत आम्हाला विकासाचा हा प्रवास करायचा आहे.”

रेनॉ कायगर हे उत्पादन भारतीय आरेखन, अभियांत्रिकी आणि उत्पादन सामर्थ्य यांच्यातील क्षमता दाखवून देईल आणि मेक इन इंडिया मोहिमेसाठीची रेनॉची ठाम कटिबद्धताही दाखवून देईल. ग्रुप रेनॉ नेहमीच नाविन्यपूर्णतेच्या ध्यासाने पछाडलेला असून, उत्पादनांच्या श्रेणीतून ते पुरेसे सिद्धही झाले आहे. रेनॉ कायगर च्या माध्यमातून रेनॉ पुढेही हेच सतत उभारत राहणार आहे.

डस्टरने प्रतिष्ठित आणि खरी एसयूव्ही म्हणून ओळख प्रस्थापित केली असून, जगभर ती यशस्वी झाली आहे आणि रस्त्यांवरील तिची उपस्थिती हेच दाखवून देते. क्विडने एसयूव्हीपासून प्रेरित रचनेने आणि या श्रेणीतील नव्या वैशिष्ट्यांनी A-हॅच श्रेणीला नवा आयाम दिला. ट्रायबरच्या माध्यमातून रेनॉने प्रशस्त, लवचिक, परिवर्तनशील आणि परवडणारा पर्याय बाजारात उपलब्ध करून दिला. रेनॉ कायगर देखील पुढील असेच चाकोरी मोडणारे उत्पादन असेल. तिचे आकर्षक रूप, स्मार्ट आणि आधुनिक वैशिष्ट्ये आणि ड्रायव्हिंगचा रोमांचक अनुभव यातून ते साध्य होईल.

रेनॉ कायगर शो कार फ्रान्समधील कॉर्पोरेट डिझाईन टीम्स आणि रेनॉ इंडिया डिझाईन यांनी परस्पर सहकार्यातून विकसित केली आहे. त्यासाठी भारतीय ग्राहकांच्या अपेक्षा, त्यांची पसंती तसेच बाजारातील बदलता कल यांचा विचार करण्यात आला आहे. चाकोरीबद्ध आणि एकसारखीच उत्पादने तयार न करण्याच्या ग्रुप रेनॉच्या वचनबद्धतेशी रेनॉ कायगर शो कार सुसंगत आहे. B – सेगमेंटकडे येणाऱ्या ग्राहकांना या कारची लक्ष वेधून घेणारी डिझाईन आणि अन्य बाबी नक्कीच आकर्षित करतील.

कार्यक्षम आणि आटोपशीर, असणाऱ्या रेनॉ कायगर शो कार ची प्रेरणा स्पोर्टी वाहनाची आहे. डबल सेंट्रल एक्झॉस्ट सिस्टिम, डबल एक्स्ट्रॅक्टर, हेग्झागोनल संरचना तिचे स्पोर्टी रूप अधिक ठसठशीतपणे दाखवून देते. त्याचवेळी प्रदर्शनासाठी ठेवलेल्या कारमधील घटक, जसे की19 इंची व्हील, मजबूत टायर्स, रूफ रेल्स, फ्रन्ट आणि रिअर स्किड प्लेट्स, 210 मिलीमीटरचा ग्राऊंड क्लियरन्स हे तिचे एसयूव्ही असणेअधोरेखितकरतात.

समोरच्या बाजूचे प्रभावी आणि परिणामकारक टू-लेव्हल फुल एलईडी हेडलाईट आणि निऑन इंडिकेटर लाईट, पाठीमागील बाजूस एलईडी लायटिंगसह दुहेरी ‘C’आकाराच्या टेललॅम्प्समुळे ही कार लगेचच नजरेत भरते.

B – सेगमेंटमधील भारतीय ग्राहकांच्या आकांक्षांच्या सखोल आणि संपूर्ण विश्लेषणाचा रेनॉ कायगर शो कार हा परिपाक आहे.या प्रदर्शनीय कारच्या माध्यमातून रेनॉ KIGER कशी असेल हे ग्रुप रेनॉकडून दाखवण्यात आले असून, त्या माध्यमातून B – हॅचबॅक, B – एसयूव्ही, एन्ट्री कार सेगमेन्टमधून वरील श्रेणीत जाणाऱ्या ग्राहकांसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला असून देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत ही कार आपला ठसा उमटवेल.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close