Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

भोकरदन मधील महात्मा फुले चौकातील अतिक्रमण हटवा त्रस्त नागरिकांनी दिले न.प.ला निवेदन



भोकरदन:सुरेश गिराम
शहरातील सिल्लोड-भोकरदन महामार्गावरील महात्मा फुले चौकातील अतिक्रमण हटवण्याची मागणी येथील मंगळवारी (ता.२९ ला दुपारी त्रस्त नागरिकांनी निवेदनाद्वारे नगर पालिका प्रशासनाला केली आहे.
दरम्यान येथील नागरिकांनी बोलतांना सांगितले की शहरातील महात्मा फुले चौक हा मुख्य मार्गावरील चौक असून नियोजित जागेपासून मुख्यमार्गापर्यंत मात्र या ठिकाणी बऱ्याच नागरिकांनी या ठिकाणी रोडवर व नियोजित जागेवर अतिक्रमण करून ठेवले आहे या मुळे शहरात रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे व शहरात अपघाताचे प्रमाणही वाढत असल्यामुळे तात्काळ अतिक्रमण हटाव अशे म्हंटले आहे यावरून त्रस्त नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला अतिक्रमण हटवून सहकार्य करावे अशे निवेदन दिले आहे
फुले प्रेमींनी वतीने देखील तात्काळ अतिक्रमण हटविण्याची मागणी
या वेळी महात्मा फुले प्रेमींच्या वतीने न.प.प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की शहरातील क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण दिवसेदिवस वाढत चालले आहे तरी येत्या ता.३ जानेवारी २०२१ रोजी जयंती साजरी होत असून
१ जानेवारी १८४८ ला देशातील पहिली शाळा फुले दाम्पत्यानी काढलेली आहे तीन जानेवारी रोजी विध्येची देवता सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार असून नगर परिषद प्रशासनाने तात्काळ अतिक्रमण काढून सहकार्य करावे असे म्हंटले आहे या निवेदनावर माजी नगरसेवक श्री राजेंद्र दारुंटे नगरसेवक रामेश जाधव अ.भा.स.परिषद ता. अध्यक्ष विलासजी शिंदे,समीरजी देशमुख,गंगाधर ढोके, भूषण जाधव, ईश्वर इंगळे,राजू गोरे,विष्णू कोलते,डॉ,नईम सर,राजू चोपडे,विष्णू घोडके,संजय जाधव सागर जाधव सुरेश गिराम,आदी,च्या स्वाक्षऱ्या आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close