Subscribe to our Newsletter
क्राईम

लोहाऱ्यात पत्याच्या क्लबवर रेड शिक्षक, नगरसेवक आणि राजकीय पुढारी सापडले


उस्मानाबाद/ सुधीर पवार – लोहारा शहरातील हिप्परगा रोडवर असलेल्या एका पत्याच्या क्लबवर प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षकांनी टाकलेल्या रेडमध्ये  काही शिक्षक, नगरसेवक आणि राजकीय पुढारी जुगार खेळताना पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 
लोहारा शहरातील हिप्परगा रोडवर  एक जुगार अड्डा सुरु होता. याठिकाणी रमी आणि तिरट  नावाचा जुगार खेळला जात होता. जुगार खेळण्यासाठी सोलापूर,उमरगा येथून काही राजकीय पुढारी येत होते. 
त्याची माहिती मिळताच उस्मानाबादच्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षकांनी गुरुवारी सायंकाळी रेड मारली असून, त्यात काही शिक्षक, नगरसेवक आणि राजकीय पुढारी जुगार खेळताना पकडण्यात आले आहेत. 
स्थानिक पोलीस निरीक्षकांना या जुगार अड्ड्याची माहिती होती, तरीही त्याकडे चिरीमिरी घेऊन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. उस्मानाबादेत आलेल्या एका प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षकांनी या पत्याचा क्लबवर रेड मारून हा क्लब उध्वस्त केला. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close