Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

तरूण मुलांनी डिजिटल हायजिन सोल्युशन्स मध्ये आपले योगदान द्यावे यासाठी डेटॉल बनेगा स्वच्छ इंडिया कॅम्पेन अंतर्गत रेकिट आणि व्हाईट हॅट ज्युनियर ने केली भागीदारी

तरूण मुलांनी डिजिटल हायजिन सोल्युशन्स मध्ये आपले योगदान द्यावे यासाठी डेटॉल बनेगा स्वच्छ इंडिया कॅम्पेन अंतर्गत रेकिट आणि व्हाईट हॅट ज्युनियर ने केली भागीदारी

–          स्वच्छता आणि आरोग्य समस्यां वर उपाय शोधणारे नाविन्यपूर्ण मोबाईल ॲप तयार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट  ‍विद्यार्थ्यांना ५० शिष्यवृत्त्या देणार

–          २०० कलात्मक संकल्पनांना मिळणार अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन 

राष्ट्रीय – एप्रिल २०२१-   आघाडीची ग्राहकोपयोगी आरोग्य आणि स्वच्छता उत्पादन करणारी कंपनी असलेल्या व पूर्वाश्रमीच्या आरबी म्हणजेच रेकिट ने आघाडीची तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षण कंपनी व्हाईट हॅट ज्युनियर बरोबर भागीदारी करून डिजिटल स्कॉलरशीप प्रोग्रामची घोषणा केली. व्हाईट हॅट ज्युनियर स्वस्थ भारत टेक चॅम्प्स प्रोग्राम असे या कार्यक्रमाचे नाव असून या उपक्रमा अंतर्गत ६-१८ वर्षे वयोगटातील मुलांना मानवी संपर्का च्या माध्यमातून वैयक्‍तिक स्वच्छते बरोबरच समाज आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करायचे आहेत.

आपल्या समाजातील लोकांचे लक्ष्य हे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण या गोष्टींकडे नेण्या बरोबरच त्यांना त्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी तरूण भारतीयांनी पुढाकार घ्यावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  या कार्यक्रमाची निर्मिती  ही तरूण मुलांची मने उत्साही ठेऊन त्यांत तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील स्वच्छतेशी संबंधित उपायांसाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.  ईॲन्डवाय कडून प्रोत्साहन देण्यात येणा-या  या खुल्या स्पर्धेत ६-१८ वर्षांपर्यंतची मुले भाग घेऊ शकतात आणि ते सध्याच्या कोविड-१९ मध्ये महत्त्वपूर्ण असणार्‍या स्वच्छतेशी संबंधित समस्येवर इलाज शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

“ सध्याची पिढी ही तंत्रज्ञानाशी खूपच सहज समरस होणारी आहे,  तंत्रज्ञान म्हणजे त्यांच्या जोडणीचे, समरस होण्याचे आणि त्यांच्या समस्या मांडण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे.”  असे रेकिट  साऊथ एशियाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंटश्री गौरव जैन यांनी सांगितले. “ अतिशय घातक अशा साथीच्या दिवसात आपले जीवन म्हणजे, राहणीमान, खाण्याच्या पध्दती आणि समाजात मिसळण्याच्या गोष्टींतही फरक पडला आहे. तसेच स्वच्छतेच्या बाबतीतही खूप बदल झाले आहेत. व्हाईट हॅट ज्युनियर बरोबरच्या आमच्या या करारामुळे आम्ही केवळ आरोग्य आणि स्वच्छते संबंधित समस्यांवर  तत्काळ उपायच शोधत नाही तर  ही गोष्ट त्यांच्यासाठी प्राधान्याची बनते.  नवीन निर्माण होणारे नवीनतम उपाय हे खूपच चांगले असतील आणि यातून ते स्वच्छतेच्या सवयींचा संदेशही देतील.”

“मुलं ही नैसर्गिक रित्या कलात्मक तर असतातच पण त्याच बरोबर त्यांना साहनुभूतीही असते.  आणि म्हणूनच ते सध्याची संकल्पना अधिक सक्षमपणे पूर्ण करू शकतात किंवा त्या अधिक चांगल्या प्रकारे प्रत्यक्षात आणू शकतात.  म्हणजेच ते ज्या संकल्पना आणतील त्या खरोखरच नाविन्यपूर्ण असतील.”असे व्हाईट हॅट ज्युनियर चेसीईओ आणि संस्थापक करण बजाज यांनी सांगितले. “ व्हाईट हॅट ज्युनियरच्या मुलांना तंत्रज्ञानाचे सक्षम वापरकर्ते बनवण्याच्या उद्दिष्ट्याचा हा उपक्रम म्हणजे सत्यात उतरवणारा एक आविष्कार आहे.”

यावेळी बोलतांना रेकिट एएमईएसए च्या एक्सटर्नल अफेअर्स आणि पार्टनरशिप्सचे संचालक श्री रवी भटनागर यांनी सांगितले “ डेटॉल बनेगा स्वस्थ  इंडिया चा असा विश्वास आहे की शिक्षण हा सामाजिक बदलाचा एक मोठा भाग असून त्यामुळे मुलांना सुध्दा शक्ती प्राप्त होते.  आम्ही सामाजिक दृष्ट्या सक्षम मनांना एक मंच उपलब्ध करून देतअसून या मुळे मुले या समस्यांवर इलाज शोधून या महत्त्वपूर्ण मोहिमेत सामील होऊन समाजात मोठा बदल घडवून आणू शकतील.   नवीन कार्यक्रमाची सुरूवात करतांना आम्ही खूपच उत्साही आहोत आणि यातून एक अनोखा असा आरोग्याशी संबंधित उपाय सापडू शकेल.”

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close