Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

राऊतांचा कांगावा, तोंडाची वाफ कशाला दवडता?; असा सवाल उपाध्ये यांनी केला



मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशीवरून केलेल्या टीकेवर भाजपने पलटवार केला आहे. संजय राऊत शुद्ध कांगावा करत आहेत. त्यांच्याकडे काही पुरावे, यादी असेल तर त्यांनी थेट ईडीला द्यावी. पत्रकार परिषदेत तोंडाच्या वाफा कशाला दवडता, असा पलटवार भाजपने केला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना संजय राऊत यांनी केलेल्या सर्व आरोपांचा समाचार घेतला. राऊत शुद्ध कांगावा करत आहेत. सकाळपर्यंत ईडीची नोटीस आलीच नसल्याचं सांगत होते. आता नोटीस आल्याचं सांगत आहेत. दोन तासांत त्यांचा सूर बदलला आहे, असं सांगतानाच राऊतांकडे 120 नव्हे 240 जणांची यादी असेल तर त्यांनी ती ईडीला द्यावी. ईडीला ही यादी देऊन कारवाईची मागणी करावी, तोंडाची वाफ कशाला दवडता? असा सवाल उपाध्ये यांनी केला. तुम्ही जर लाभार्थी नसाल तर ईडीला तशी माहिती द्या. ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाका, असा सल्लाही त्यांनी दिला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close