Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

रतनकुमार साळवे “राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कारा”ने सन्मानित

औरंगाबाद : दिनांक २२ शुक्रवार रोजी शिर्डी येथे रतनकुमार साळवे यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख,शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब लोखंडे, कार्यक्रमाचे संयोजक, सरपंच सेवा संघांचे अध्यक्ष यादवराव पावशे पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण राज्यातुन पत्रकार आणि सरपंच मोठ्या संख्येने यावेळी कार्यक्रमाला हजर होते. मोठ्या दिमाखात हा सोहळा संपन्न झाला.औरंगाबाद जिल्ह्यतुन रतनकुमार साळवे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.आजपर्यंत साळवे यांना उत्कृष्ठ पत्रकारिता केल्याबद्दल विविध पक्षसंघटना,संस्थाच्या वतीने आजपर्यंत ३० पुरस्कार मिळालेले आहेत.यामध्ये प्रामुख्याने ३ राज्यस्तरीय पुरस्कार आहेत. रतनकुमार साळवे उत्तमरित्या पत्रकारिता करत असतानाच,निळे प्रतीक बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक जणहितवादी उपक्रम राबवलेले आहेत.कोरोना संकट काळी लॉकडावून दरम्यान त्यांच्या संस्थेचे कार्य प्रभावी असेच राहिलेले आहे.आज मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close