Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

रावसाहेब दानवेंना घरात घुसून मारायला हवं’ : बच्चू कडू

मुंबई:शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे “, असा अजब दावा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर दानवेंवर चहूबाजूंनी टीका होत आहे. याबाबत प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टीकाटिपणी केली. “रावसाहेब दानवे यांना आता घरात घुसून मारावं लागेल,” असा संताप प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना इथं बोलताना, ‘हे आंदोलन एक कटकारस्थान आहे. आंदोलकांना चीन व पाकिस्तानाची मदत फूस आहे,’ असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दानवे यांचं वक्तव्य केंद्र सरकारनं गांभीर्यानं घेऊन चीन व पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करावा, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. तर, बच्चू कडू यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना दानवे यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. ‘मागच्या वेळेस दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. मात्र, आता परिस्थिती अशी आली आहे की आम्हाला त्यांच्या घरात घुसून त्यांना चोप द्यावा लागेल,’ असं कडू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close