Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबादेत आजपासून १४ मार्चपर्यंत राञीची संचारबंदी


वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमिवर औरंगाबाद शहरात आजपासून राञी ११ ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद : विदर्भात कोरोनाचा स्फोट झाला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये दररोज शेकडो नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अमरावती आणि अचलपूर शहरात तर भयानक परिस्थिती आहे. अचलपूरमध्ये तर अनेक कुटुंबांना बाधा झाली आहे. त्यामुळे तिथे आठवड्याभरासाठी कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाने मोठं पाऊल उचललं आहे. प्रशासनाने औरंगाबाद शहरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहेऔरंगाबादेत रात्री फक्त ‘या’ सुविधा सुरु राहणार

औरंगाबादेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी 14 मार्चपर्यंत असणार आहे. संचारबंदीच्या कालावधीत उद्योग आणि आरोग्य व्यवसाय वगळता बाकी सगळं बंद राहणार आहे. याबाबतचा निर्णय नागपूर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रशासनाच्या धडाडीच्या कारवाया आणि निर्णयाची अंमलबजावणी

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या आठवड्यात अनेक धडाडीच्या कारवाया केल्या. तसेच अनेक महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली. यापुढेदेखील अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

विदर्भा पाठोपाठ मराठवाड्यात कोरोनाचा कहर

विदर्भपाठोपाठ मराठवाड्यात कोरोनाचा कहर बघायला मिळतोय. मराठवाड्यात काल (22 फेब्रुवारी) दिवसभरात तब्बल 444 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 132, जालना 137, परभणी 22, हिंगोली 9, नांदेड 59, लातूर 35, उस्मानाबाद 11 आणि बीड जिल्ह्यातीलही काही रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबादमध्ये किती रुग्ण सक्रीय?

औरंगाबादमध्ये काल दिवसभरात 132 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 48770 वर पोहोचला आहे. यापैकी 46574 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1255 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सध्या औरंगाबादेत 941 रुग्णांवर उपचार सुरु आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close