Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

व्यापार्‍यावर गोळीबार:नरसी बिलोली रोडवरील लोहगांवच्या वळण रस्त्यावर

नायगाव / mh20live Network शेषेराव कंधारे
                    भुईमूग शेंगाचे सव्वा सात लाख रुपये नरसी येथून आपल्या मुनीमासह मोटरसायकल वरून कासराळी कडे घेऊन जाणाऱ्या व्यापार्‍यावर गोळीबार करून रक्कम लुटण्याच्या  तीन दरोडेखोरांच्या मुसक्‍या युवकाच्या साथीने  रामतीर्थ पोलिसांनी आवळल्या असून हा फिल्मी स्टाईल थरार 1 जून रोजी रात्री पावणे अकराच्या  सुमारास नरसी बिलोली रोडवरील लोहगांवच्या वळण रस्त्यावर घडली.
           मुखेड येथील एका व्यापाऱ्याकडून भुईमूग शेंगाचे येणे असलेली 7 लाख 24 हजार रुपयाची रक्कम घेऊन मुखेडहून एका ओळखीच्या चार चाकी वाहनात बसुन नरसीत आलेल्या व राञ झाल्यामुळे वाहन मिळणार नाही यासाठी नरसीहुन मुनिमाला घेवून जाण्यासाठी  कासराळी ता.बिलोली येथील व्यापारी संजय व्यंकटेश उपलंचवार हे काल दिनांक 1 जून रोजी रात्री साडेदहा  वाजता त्यांची दुचाकी क्रमांक MH – 26 Q 5550 यावरून नरसी येथे आले.रकमेसह मुनीमाला घेऊन ते आपल्या दुचाकीवरून कासराळीकडे पावणे अकराच्या दरम्यान निघाले असता, नरसी – बिलोली महामार्गावरील लोहगांव वळणावर MH – 26 W 9713 या दुचाकीवर आलेल्या मिर्झा शब्बरबेग मिर्झा गफारबेग वय 32 रा. ईदगाहगल्ली देगलूर नाका नांदेड, शेख मोईन शेख नईम वय 22 रा.ईदगाहगल्ली देगलूर नाका नांदेड व सुनील सुरेश सुळगेकर व 20 राहणार बंदाघाट नांदेड या तिघांनी  त्यांच्याशी झटापट करून 7 लाख 24 हजार रुपयाची बॅग हिसकावून घेण्याच्या प्रयत्न केला.
          परंतु व्यापारी संजय उपलंचवार यांनी जोरदार प्रतिकार करत असल्याचे पाहून चोरट्या आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीतून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने गोळी व्यापारी उपलंचवार यांच्या डोक्याला चाटून गेल्यावरही त्यांनी एका चोरट्याला जखडून ठेवले होते.त्यानंतर दुचाकी घटनास्थळी सोडून चोरटे हे लोहगांव शिवारात पळून गेले.व्यापारी उपलंचवारांनी गावकऱ्यांना सदरची माहिती दिली. व्यापारी व चोरट्यांची फिल्मी स्टाईल थराराची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेवून या तिन्ही आरोपींच्या मुसक्या नरसी शिवारात आवळत त्यांना जेरबंद केले.या घटनेची माहिती मिळताच नांदेड हुन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,अप्पर पोलिस अधीक्षक दत्‍तराम राठोड,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.सदरच्या लुटमारीत दोन आरोपी हे मूळ नांदेडच्या देगलूर नाका भागातील तर एक जण बंदा घाटचा असल्याने या लुटमारीचे कनेक्शन कुठून तयार करण्यात आले,कोणी केले हे पोलीस तपासात पुढे निष्पन्न होईल.

  तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

          कालच्या व्यापारी लुटमार प्रकरणातील वरील तिन्ही आरोपींना कलम 394,397/ 25 या गुन्ह्याखाली अटक केल्यानंतर आज दि. 2 जून रोजी रामतीर्थ पोलिसांनी आरोपींना बिलोली येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोरटसायकल ही चोरीची असल्याची माहिती मिळाली असुन पोलिस कोठडीच्या माध्यमातून आणखी किती चो-या,दरोडे,लुटमार आरोपींनी कोठे कोठे केलीत याचाही पर्दाफाश होणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close