Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

पैठण :राम टेकडी मेहरबान नाईक तांडा घटनेतील हल्ला प्रकरणी ३० अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल


दगडफेकीत महंत गणेशपुरी महाराज बचावले – घाटीत उपचार सुरू,बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


पैठण / किरण काळे

पैठण तालुक्यातील मेहरबान नाईक तांडा येथील राम टेकडीवरील साधू महंत गणेशपुरी महाराज यांच्यावर निलजगाव येथून दिंडी घेऊन गेलेल्या गावक-यांनी दि.२५ शुक्रवारी सकाळी अकरा वाजे दरम्यान काठ्या लठ्यासह तुफान दगडफेक करीत जिवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात महंत गणेशपुरी महाराज गंभीर जखमी झाले होते.जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महाराजांना भक्तांनी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.झालेल्या दगडफेकीत महाराज गंभिर जखमी झाले होते.त्यांनी आपल्या बचावासाठी पळ काढल्यामुळे त्यांचा प्राण वाचला असल्याचे सांगितले आहे.वरील घटनेची बिडकीन पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आलेली आहे.शुक्रवारी मोक्षदा एकादशशीच्य मुहूर्तावर निलजगाव (ता.पैठण)  येथील गावकरी दर्शनासाठी मेहरबान नाईक तांडा येथील श्रीराम टेकडीवर दर्शनासाठी गेले होते.या दरम्यान दिंडीतील गावकरी व टेकडीवरील साधू महंत गणेशपुरी महाराज ( पंच दशनाम जुना आखाडा उत्तराखंड) यांच्यात बाचाबाची होऊन प्रकरण चिघळले व गावकरी आक्रमक झाले या नंतर महाराज दोन्ही हातात तलवार घेऊन गावक-यासमोर उभे राहिले महाराजांनी तलवार काढल्यानंतर  गावकर्यांनी महाराजांवर दुरूनच तुफान दगडफेक केली या दगडफेकीत महाराज गंभीर जखमी झाले या नंतर काही जेष्ठ नागरिकांनी समजूत घालून गावक-यांना माघारी पाठवून गंभीर जखमी महाराजांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल केले. वरील घटनेचा उलट सुलट व्हिडीओ व्हायरल झाला असून गावकरी आणि भक्तांकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत साधू महंत गणेशपुरी महाराज यांच्या फिर्यादीवरून निलजगावसह परिसारातील २५ ते ३० अज्ञातांविरूद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा तापस बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहूल पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुधाकार चव्हाण,बीट जमदार रमेश तंगडे,संजय चव्हाण यांच्यासह आदी पोलीस  पुढील तपास करीत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close