Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

राज्यसभेच्या शपथविधी:महाराष्ट्रातील सहा नेत्यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ

राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने अनुपस्थिती

नवी दिल्ली : mh20live Network

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा आज शपथविधी सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील 7 जणांची खासदारपदी नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती भोसले, शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड यांनी खासदारकीची शपथ घेतली आहे. तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या. दरम्यान आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर भागवत कराड,राजीव सातव, प्रियंका चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.

दिल्लीतील राज्यसभा सदनात हा शपथविधी सोहळा पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातून सात जणांची मार्च महिन्यात खासदारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामधील केवळ सहा जणांनी शपथ घेतली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान या कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्या आज शपथ घेऊ शकल्या नाहीत. उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्याकडून त्यांचे नाव पुकारण्यात आले. मात्र त्या गैरहजर राहिल्यानंतर पुढच्या सदस्याची शपथ घेण्यात आली.

महाराष्ट्रातील सात खासदार

उदयनराजे भोसले – भाजप

भागवत कराड – भाजप

रामदास आठवले – भाजप पुरस्कृत

शरद पवार – राष्ट्रवादी

फौजिया खान – राष्ट्रवादी

राजीव सातव – काँग्रेस

प्रियंका चतुर्वेदी – शिवसेना

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close