Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

एक महिन्याच्या आत राज्यातील 15-17 हजार रिक्त जागांची पदे भरणार आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई, :mh20live.com

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महत्त्वाची घोषणा केली. आगामी काळात एक महिन्याच्या आत राज्यातील 15-17 हजार रिक्त जागांची पदे भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यांनी कोरोना नियंत्रणासोबतच कोरोनावरील औषधांच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, “रिक्त पदांचे आश्वासन आम्ही दिले आहे. त्या भरतीचे धोरण ठरवण्यावर काम सुरू आहे. पूर्वी झालेल्या एकत्रित परीक्षांच्या गुणांवरून काही पदे भरता येतील का,, यावर विचार सुरू आहे. कोणत्या पदांसाठी मुलाखती घ्याव्या लागतील, यावर धोरण ठरविण्याची प्रक्रिया झाली आहे. पुढील महिन्याभराच्या आत आपल्या सर्व 15-17 हजार पदे भरण्याचे काम केले जाईल.” राजेश टोपे म्हणाले, “मुंबईत दोनच विषय होते. बेडची अपुरी व्यवस्था होती, मात्र आपण मोठ्या प्रमाणात अतिदक्षता बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मुंबईकरांनी 650 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करावा. खासगी रुग्णवाहिकांना बोलावू नका, ते लुटतील. 1916 या आपतकालीन सेवेचा उपयोग करुन सरकारी रुग्णवाहिकांची सेवा घ्या. शहरांमधील आरोग्यावर लक्ष देण्यासाठी शहरांसाठी स्वतंत्र आरोग्य संचालकाचे पद तयार करण्यात येईल. सार्वजनिक आरोग्य केवळ ग्रामीण भागापुरतं मर्यादित न ठेवता शहरांमध्ये देखील सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी हे पद असेल. येणाऱ्या दोन दिवसांत याबाबत तुम्हाला बदल दिसेल.” “फक्त श्रीमंतांसाठीच उपलब्ध असलेली कोरोनावरील औषधे आपण महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणार आहोत. यासाठी भारतातील औषध कंपन्यांना परवानगी दिली आहे. जूनच्या अखेरपर्यंत ही औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येतील. यासोबतच राज्यात मुबलक प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत, यासाठी केंद्राला विनंती केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी परीक्षांची तयारी करत आहेत. ते अशी तयारी करत बसले तर या डॉक्टरांची सेवा रुग्णांना उपलब्ध होणार नाही. त्यामुळे केंद्राला त्यांची परीक्षा 5-6 महिने पुढे ढकलण्याची किंवा मागील गुणांवरुन मूल्यांकन करण्याची विनंती केली आहे. रुग्णालयांमधील काम हेच इंटर्नशिप समजावी असेही सांगितले. हा केवळ एका राज्यासाठी नाहीतर संपर्ण देशासाठी निर्णय घेण्याची विनंती केली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close