Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

सिल्लोड तालुक्यात पावसाचे उपोषण खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्ह

सिल्लोड तालुक्यात पावसाचे उपोषण खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्ह

विशाल जाधव/सिल्लोड

जून दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला होता.आणि बळीराजा या वेळी मात्र पाऊस आपल्याला चांगली साथ देईल व आपले कर्ज व इतर गरजा पूर्ण करून देईल या आशेने मोठ्या जिद्दीनं पेरणी करून पुढील कामी लागला. पण झाले मात्र उलटेच जिल्ह्याचा पिच्छा सोडायचा च नाही व यंदाही दुष्काळाचे चक्र बळीराजा स दाखवायचे असाच चंग जणू वरुनराजाने बांधलाय कि काय असेच मागील १ महिन्यापासून वाटू लागले आहे. सुरवातीच्या काळात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावून पिकांना चांगलीच उभारी दिली. सुरवातीला दमदार पीक पाहून अन्नदाता बऱ्यापैकी सुखावला होता.पण गेल्या १ महिन्यापासून पावसाची थोडी फार फवारणी वगळता पाऊसच जिल्हा भरात झाला नाही.मका ,कापूस,सोयाबीन,तूर,मिरची,ज्वारी,उडीद,बाजरी,या पिकांनी अपुऱ्या पावसामुळे आता अक्षरशः माना टाकायला सुरवात केली आहे.पाळीव जनावरांसह मानवी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे.एकीकडे देशात पावसाने हाहाकार घातला असून मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट आता गडद हॊतांना दिसत आहे.जवळपास निम्मा पावसाळा होत आला असतांना हि स्थिती आहे.आता हा अनुशेष कसा  भरून निघतो की दुष्काळाची तीव्रता अजून वाढवतो हे समजेलच.!आता यावर शासनकर्ते काय भूमिका घेतात तेही महत्वाचे आहे कारण अन्य लाभाच्या गोष्टींसाठी लगेच निर्णय घेणारे शासन बळीराजाच्या बाबतीत धोरण राबवायला नेहमी सारखे उशीर करते कि काही ठोस उपाययोजना  राबवते हे हि समजेल.अजूनही उरलेल्या दिवसात राहिलेली कसर भरून काढून हवामान खात्याने सांगितलेल्या पावसाची सरासरी गाठल्यास निदान पुढील काळात पाण्यासाठीची दैना थोडी कमी होईल अशी आशा करायला काय हरकत आहे.

पिकांनी टाकल्या माना


सिल्लोड तालुक्यात अत्यन्त दयनीय अवस्था अपुऱ्या पावसाने झाली असून मका,सोयाबीन,कपाशी या पिकांसह मिरची व अन्य भाजीपाला पिके अगदी शेवटची घटका मोजत आहे.धोत्रा,पानवडोद,शिवना,गोळेगाव,अजिंठा,आमठाणा, भराडी, पालोद,सिल्लोड परिसर,अनाड, आदी गाव परिसरांमधील पिके अगदी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.शासनाने याबाबत दखल घेऊन तात्काळ परिस्थिचे गांभीर्य लक्षात घेऊन बळीराजास तातडीची मदत देने गरजेचे आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close