Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

रायगडकरांना लवकरच उपलब्ध होणार अद्ययावत कौटुंबिक न्यायालयाची सुविधा

          अलिबाग,जि.रायगड, :-  विधी व न्याय विभागाच्या दि.18 ऑगस्ट, 2017 च्या शासन निर्णयान्वये 14 व्या वित्त आयोगांतर्गत राज्यात 5वर्षाच्या कालावधीकरिता 9 कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये रायगड-अलिबाग येथील कौटुंबिक न्यायालयाचाही समावेश होता. तद्नंतर हे कौटुंबिक न्यायालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विविध बाबींसाठी शासनाकडे पाठपुरावा केला.

त्यानुसार 14 व्या वित्त आयोगांतर्गत अलिबाग, जिल्हा रायगड येथील प्रस्तावित कौटुंबिक न्यायालयाकरीता फर्निचर पुरवठा करण्यासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांनी प्रस्तावित केलेल्या 24 लक्ष 4 हजार 413 रुपये इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकातून 5 % Centage Charges वगळून  23 लक्ष 91 हजार 876 रुपये इतक्या रक्कमेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता लवकरच रायगड जिल्ह्यातील जनतेला उत्तम अशा कौटुंबिक न्यायालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close