Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाददेशविदेश

शहीद जवान ॠषीकेश बोचरे यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

औरंगाबाद/mh20live Network

दि.14- औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील जवान ॠषीकेश अशोक बोचरे युनिट 119 असॉल्ट इंजिनियर रेजिमेंट यांना चीनच्या सीमेवर कर्तव्यावर असताना 12 मे 2020 रोजी सकाळी 11:50 वाजता वीरमरण आले . त्यांचे पार्थिव विशेष विमानाने आज सायंकाळी पाच वाजता चिकलठाणा विमानतळ येथे आणण्यात आले आणि तिथुन त्यांच्या मूळगावी देवगाव रंगारी येथे नेण्यात आले. तेथील बाजारपेठ परिसरात रात्री शासकीय इतमामात शहीद बोचरे यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.यावेळी पोलिस तसेच सैन्यदलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत शोकाकुल वातावरणात गावकऱ्यांनी, उपस्थितांनी शहीद बोचरे यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.
यावेळी शहीद जवान ॠषीकेश बोचरे यांचे आई वडील,पत्नी,मोठे बंधू , नातेवाईक यांच्यासह कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, सरपंच श्रीमती सोनवणे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक,(ग्रामीण) गणेश गावडे, संदीप गावित, पोलिस उपअधीक्षक (गंगापूर) , सैन्य अधिकारी कॅप्टन पिनाकी पांडा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत, तहसिलदार संजय वरकड , सहायक पोलिस निरीक्षक संजय अहिर, ग्राम विकास अधिकारी डॉ.वेनीकर यांच्यासह संबंधित अधिकारी, गावकरी उपस्थित होते.
शहीद जवान ॠषीकेश बोचरे यांच्या स्मरणार्थ देवगाव रंगारी बाजारपेठेस शहीद बोचरे यांचे नाव देण्यात येणार असल्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी यावेळी जाहीर केले.
*

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close