Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

रा.प. कामगारांना ५० लक्ष रुपयांचा विमा ; मनसेच्या मागणीला यश ; परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा

औरंगाबाद | दि.२ mh20live कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव काळातही काम हीच ईश्वर सेवा हेच ब्रीद अंगी बाळगणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आता 50 लाख रुपयांचा विमा कवच लागू करण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला असून मुंबईत झालेल्या बैठकीत सोमवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने हि मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबाद मध्ये दिलेल्या निवेदनाला यश मिळाले असून या निर्णयाचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, मराठवाडा अध्यक्ष अशोक पवार पाटील, मराठवाडा सचिव संदीप जाधव, व जिल्हाध्यक्ष उमेश दीक्षित यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडणे तसेच जिल्हा अंतर्गत वाहतूक करण्याचा महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य परिवहन बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. एसटी कर्मचारी प्रवाशांना सेवा देण्यासाठी शासनाच्या मदत कार्यात रात्रंदिवस काम करत आहेत. त्यामुळे मदत कार्य करताना धोरणाशी संबंधित येऊन एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच विमा संरक्षण नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, हि बाब लक्षात घेऊन औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचा विमा देण्यात येण्याची मागणी निवेदनाद्वारे लावून धरली होती. याबाबत रा.प. औरंगाबाद चे विभाग नियंत्रक अरुण सिया यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी सायंकाळी परिवहन मंत्र्यांनी याबाबत बैठक घेत ५० लाख रुपयांचा विमा देण्याचे जाहीर केले. या सोबतच मनसेने दिलेल्या इतर मागण्याही मान्य झाल्याने परिवहन कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष एन.डी. दिनोरीया, सतीश लक्कस, संजय कापसे, नीरज वैजापूरकर, रवींद्र शिरसाट व कैलास पाटील यांच्यासह या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close