Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

पैठण तालुक्यात अतिरिक्त ऊसतोडणीचा प्रश्न “ऊस उत्पादक चिंताग्रस्त”

पैठण /युनुस पठाण
यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली . उसाचे पीक जोमात आले .मात्र आता संकट हे निसर्गाचे नाही तर . ऊस कारखान्यावर गाळपाला जाईल की नाही ? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे . अतिरिक्त उसाचा प्रश्न शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखानदारांना भेडसावणार आहे . तोडणीअभावी ऊस उभाराहतो की काय या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे . २०२० वर्ष हे निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांना कठीण जात गेले . जूननंतर सुरुवातीला पडलेल्या पावसाने शेतकरी खुश होता . सोयाबीन,कापूस,ऊस पिकांची मोठ्याप्रमाणात लागवड झाली .पीक ऐन भरात येत असताना परतीच्या धुवांधार पावसाने अतिवृष्टीचा कहर करून सर्व पिकांची नासधूस करून टाकली .पाण्याचे सिंचन चांगले झाल्याने अगोदरच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांनी ऊस हे पीक निसर्गाच्या प्रकोपातदेखील टिकून ठेवले .ऊस उभा राहिल्यास शेतकऱ्यांचे अर्थकारण पाच वर्षे मागे जाते.तसेच परिसरातील राजकारणावरदेखील त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असते . पैठण तालुक्यात अंदाजे 18 लाख मेट्रिक टन उसाचे उत्पन्न होते त्यामुळे कसेही करून अतिरिक्त ऊस शिल्लक राहता कामा नये यासाठी कारखानदार प्रयत्नात आहेत .
पैठण तालुक्यातील संत एकनाथ व रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाल्याने ऊस गाळप कसा करावा याची चिंता ऊस बागायतदारांबरोबरच कारखानदारांनाही लागली आहे .यंदा वरील दोन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अंदाजे 18 लाख मेट्रिक टन ऊस गाळपास आहे पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना व रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखाना कारखाना मिळून अंदाजे 7 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करतील अशी स्थिती आहे . दोन्ही कारखान्यांचे गाळप लक्षात घेता कार्यक्षेत्रात अंदाजे 11 लाख मेट्रिक टन ऊस अतिरिक्त ठरणार आहे . या अतिरिक्त ऊसासाठी कार्यक्षेत्राबाहेरील कन्नडचा बारामती ऍग्रो ,शेवगाव येथील गंगामाई शुगर ,चित्तेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजी राजे ,या कारखान्यांना काही प्रमाणात ऊस गाळपासनेला जात आहे .मात्र तरी देखील बराच ऊस गाळपाअभावी उभा राहण्याची शक्यता आहे.

चौकट
संत एकनाथ हा स्व.पंढरीनाथ पाटील शिसोदे यांनी स्थापन केला. तर दोन दशके का पूर्वी रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली परंतु. दिवसेंदिवस उसाचे क्षेत्र वाढत आहे परंतु अद्याप पर्यंत दोन्ही कारखान्यांनी आपली गाळप मर्यादा वाढली नाही.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close