Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना इंटरनँशनल अकँडमी अँवार्ड


औरंगाबाद दि.१३ :ज्येष्ठ माध्यम नि शिक्षणतज्ज्ञ व एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना आफ़्रिका खंडाचा आतंरराष्ट्रीय पातळीवरचा शिक्षणक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल “इंटरनँशनल अकँडमी अँवार्ड २०२० “घोषित करण्यात आला आहे. उच्चशिक्षण व सामाजिक क्षेत्रातील हा अांतरराष्ट्रीय पुरस्कार  याच महिन्यात २७ जून रोज़ी विशेष पदवीप्रदान समारोहात दिला जाणार आहे. ग़रीब व वंचित घटकातील विद्यार्थी वर्गास सामाजिक न्यायाव्दारे  सक्षम करण्यासाठी व मानवतेच्या कार्यासाठी हा सन्मान युनीकँरेबियान बिझीनेस स्कूल , युनिव्हर्सिटी ऑफ़ द कॉमनवेल्थ कँरीबीयन यांनी हा पुरस्कार दिला आहे. सद्याच्या कोरोना परिस्थितीमुळे प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना विशेष पदवीप्रदान समारंभास उपस्थित राहणे शक्य होणार नाही. प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आपल्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ अध्यापन कारकिर्दीत सामाजिक समता व मानवतेसाठी विद्यापीठस्तरावर काम केले आहे. वंचित व ग़रीब समाजातील शेकडो पत्रकार, संपादक , जनसंपर्क अधिकारी , टीव्ही -रेडिओतील पत्रकार व माध्यमकर्मी त्यांचे विद्यार्थी राहिलेले आहेत. अध्यापनापलीकडे जाऊन विद्यार्थी वर्गास आयुष्यात उभे करण्यात त्यांनी आधार दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक म्हणून दोन टर्म प्रभावी काम केले व ग़रीब विद्यार्थी वर्गासाठी असणारी कमवा व शिका योजनेचा व्यापक विस्तार केला . उत्तम प्राध्यापक , वक्ते , लेखक म्हणूनही त्यांचे लक्षणीय योगदान आहे.अधिष्ठाता, संचालक , विभागप्रमुख तसेच कुलगुरू या पदांचा नि राष्ट्रीय पातळीवरील युजीसी व नँक आदिसंस्थांचाही  अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांचे ते पाईक आहेत. नामांतर लढ्यावरील महत्वपूर्ण ग्रंथ , अलीकडेच डॉ. आंबेडकरांवरील १२ ग्रंथमालिकेचे संकल्पन व संपादन त्यांनी केले आहे.

ReplyForward
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close