Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

उज्जैनला दर्शनासाठी जाणाऱ्या कन्नडच्या तरुणांवर काळाचा घाला

इर्टीगा पलटी होऊन तीन तरुण ठार ,दोन गंभीर ,तीन जखमी

कन्नड :उज्जैन/mh20live network
येथील तरुण उजैन येथे महाकाल दर्शनासाठी जात असताना इर्टीगा गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन तरुण ठार झाले असून दोन जण गंभीर तर तिघे जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्याजवळील जलशुद्धीकरण केंद्राजवळ शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली.


या बाबद अधिक माहिती अशी की, कन्नड शहर व परिसरातील तरुण श्रावण मासानिमित्त मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकाल च्या दर्शनासाठी दिनांक २०आगस्ट रोजी इर्टीगा ( क्र. एम एच २२,यु ७१२८)वाहनाने रात्री दहा वाजेच्या सुमारास कन्नड येथून निघाले होते. रात्री एक वाजेच्या सुमारास बाभळे फाट्याजवळील जलशुद्धीकरण केंद्राजवळ इर्टीगा गाडी जबर पलटी होऊन त्यातील गणेश भगवान हिरे वय २६ वर्षे रा. शांतीनगर कन्नड ,पवन विजय जाधव वय २४ वर्षे रा. सरस्वती कॉलनी कन्नड ,सचिन सुभाष राठोड वय २७ वर्षे,रा.उंबरखेडा ता.कन्नड हे तीघे तरुण ठार झाले असून सागर समाधान पाटील वय २३ वर्षे रा. शेंदूरणी ,नवनाथ आण्णा बोरसे वय २६ वर्षे रा.निपाणी ता.कन्नड,शिवाजी जग्गु जाधव वय २६ वर्षे रा.सितानाईक तांडा ता.कन्नड,किशोर आसाराम राठोड वय २६ वर्षे रा.वडणेर ता.कन्नड ,गौरव कांबळे वय २७ वर्षे रा.हिवरखेडा रोड कन्नड आदी पाच जण जखमी झाले आहेत.सर्व तरुण हे एल एन टी फायनान्स कंपनी मध्ये कार्यरत होते.
सदर जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव,वाहतूक शाखेचे निरीक्षक हेमंत कुमार भामरे,शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भांबड यांनी घटनास्थळी भेट दिली.दरम्यान या अपघात प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शिंदखेडा पोलिस करीत आहेत .
या अपघाताचे वृत्त कन्नड शहर व तालुक्यात कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.


सदर तरुणांनी दुसरे वाहन केलेलं होते,मात्र त्या वाहनाचे दर जास्त असल्याने या तरुणांनी दोन रुपये प्रति किमी कमी दर असलेले वाहन केले आणि दर्शनासाठी निघाले होते मात्र याच वाहनाने पलटी घेतल्याने तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची चर्चा शहर व परिसरात होती.या अपघातात सर्व तरुण असल्याने त्यात तिघे ठार व इतर जखमी झाल्याने तालुकाभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close