Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

धक्कादायक:अकाउंटमध्ये पैसे टाक, नाहीतर तुझा सेक्स व्हिडिओ व्हायरल करतो; शाळकरी विद्यार्थ्याला धमकी

नाशिक : ऑनलाईन अभ्यास (Online Study) करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना (Student) आता एका वेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. माझ्या बँक अकाउंटमध्ये पैसे टाक, नाहीतर तुझा सेक्स व्हिडिओ (Sex Video) सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल करतो, अशी धमकी देणारे फोन सध्या नाशिकच्या विद्यार्थ्यांना येत आहेत.

नाशिकमधील अशाच एका त्रस्त पालकांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या घटनेनंतर नाशिकमध्ये पालक आणि विद्यार्थीवर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या नाशिकच्या विद्यार्थ्यांची आता वेगळीच डोकेदुखी वाढली आहे. आमच्या अकाउंटवर तात्काळ पैसे टाक, नाहीतर तुझा सेक्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतो, अशा धमकीचा फोन सध्या नाशिकच्या काही विद्यार्थ्याना येतो आहे. विशेष म्हणणे हे अज्ञात फोन करणारे विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील धमकी देत आहेत. ‘तुमच्या मुलाचा सेक्सी व्हिडिओ व्हायरल करतो, अशा धमक्या आता काही पालकांनीही मिळत आहेत. सामाजिक क्षेत्रात निडरपणे काम करणाऱ्या राजू देसले यांच्या मुलाला देखील असा धमकीचा कॉल आल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आहे. या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या मुलांना धमकी देणारी आंतरराज्यीय मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या फोन कॉलमुळे ऑनलाईन अभ्यास करणारे विद्यार्थी कमालीचे विचलित झाले आहेत. अनेकांनी या फोन कॉलच्या भीतीपोटी ऑनलाईन अभ्यास करणंच बंद केल्याचं समोर आलं आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close