Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

शिवसेनेला धक्का; “या” माजी आमदारांचा भाजपात प्रवेश

मुंबई : नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला धक्का देत पुन्हा भाजपचा हात धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सानप यांनी मुंबईत भाजपप्रवेश केला. “महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्यामुळे पक्षात बाहेरील नेत्यांचे आगमन होणार असल्यांच्या पुंग्या सोडल्या जात आहेत. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. बाळासाहेब सानपांनी केवळ दहा मिनिटात पुनर्प्रवेशाचा निर्णय कसा घेतला? याचा किस्सा फडणवीसांनी सांगितला. सानप यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन, आशिष शेलार उपस्थित होते.

“दुरावलेले बाळासाहेब सानप भाजपमध्ये पुनर्प्रवेश करत आहेत. नाशिकमध्ये भाजपच्या वाटचालीत ज्यांचे परिश्रम आहेत, त्यात सानप येतात. काही समज-गैरसमजांमुळे अंतर निर्माण झाले, मात्र ते मनापासून आपल्यासोबतच होते. पक्षाचा एवढा मोठा नेता, ज्याच्या मनात पक्ष आहे त्यांना सोबत घ्यायला हवं, असं आम्हालाही वाटलं. आम्हाला काही निगोसिएशन्स करावी लागली नाहीत. निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या आधी आणि नंतरही आमचं बोलणं होत होतं. आमच्या सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे” असं फडणवीस म्हणाले.

“जुने-नवे वाद नाही”

“बाळासाहेब सानप यांनी केवळ दहा मिनिटात पुनर्प्रवेशाचा निर्णय घेतला. मला भाजपमध्येच रहायचं आहे. मी काहीही करण्यास तयार आहे, असं ते म्हणाले. गेली 35 वर्ष त्यांनी काम केलं, आणि पुढची 35 वर्ष आणि कायमच आपल्याला आनंदाने काम करायचं आहे. बाळासाहेब सानप हे जमिनीशी जोडलेले नेते आहेत. जुने-नवे असा कोणताही वाद नाही, ते जुनेच आहेत, फक्त नव्याने आलेले आहेत. नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला आहे.” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

देशाचं भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही”

भाजपचे आमदार आमच्याकडे येणार, अशा वावड्या महाविकास आघाडीचे नेते उठवत राहतात. पण कुणीही पक्षात जाणार नाही. विरोधकांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ते पुंग्या सोडतात आणि त्यांच्या पुंग्या त्यांचीच लोक वाजवतात, असा टोला फडणवीसांना लगावला. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत. या देशाचं भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, याची त्यांना जाणीव आहे. एकत्र लढण्याचा तिन्ही पक्षांना तात्कालिक फायदा होईल, पण त्यांच्या राजकीय स्पेसमध्ये किती जण मावतील, यात शंकाच आहे. आणि ती स्पेस भाजपसाठी मोकळी असून आम्ही व्यापल्याशिवाय राहणार नाही, एखाद्या निवडणुकीत इकडे तिकडे झालं तर चिंता करायचे कारण नाही, असं फडणवीस म्हणाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close