Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल येण्यास लागणार 40 तास!


पुणे/mh20live Network

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेला पुण्यातल्या बालेवाडी इथल्या शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघात निकाल पहिल्या पसंतीच्या मतामध्येच लागणार की पुढील फेऱ्याची मतमोजणी करावी लागणार, याबाबतचं अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे पदवीधरसाठी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तर शिक्षकसाठीचे चित्र साधारण सायंकाळी 7 वाजेपर्यत स्पष्ट होऊ शकतं, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरवातीला विभागातील पाच जिल्ह्याच्या मतपत्रिका तसेच पोस्टल मत पत्रिका एकत्र करण्यात आल्या, पदवीधर साठी 867 पोस्टल तर शिक्षकसाठी 32 पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. या सर्व मतपत्रिका सरमिसळ करण्याचे काम सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपारचे दोन वाजणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून वैध अवैध मत बाजूला करत असतानाच पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाणार आहे.

पोस्टल मतदानासह पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख 47 हजार 917 तर शिक्षकसाठी 53 हजार19 इतके मतदान झाले आहे. या सर्व मतपत्रिका एकत्र करून त्यातल्या वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या केल्या जात असतानाच विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे नऊ वाजू शकतात, असा अंदाज विभागीय आयुक्तांनी वर्तवला आहे.

या प्रक्रियेत एखाद्या उमेदवाराने विजयासाठीचा कोटा पूर्ण केला तर शिक्षकचा निकाल साधारण सायंकाळी 7 वाजता तर पदवीधरचा निकाल रात्री नऊ वाजता लागू शकतो. पहिल्या पसंतीच्या मतामध्येच विजय मिळवण्यासाठी वैध मतदान भागिले 2, अधिक 1 मत आवश्यक आहे. त्यामुळे एकतर्फी निवडणूक झाल्यास रात्री नऊ वाजता निकाल अपेक्षित आहे.

पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण होऊ शकला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत. ही प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्याच्या पदवीधरसाठी 60 फेऱ्या तर शिक्षकसाठी 32 फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी अंदाजे अर्धा तास वेळ गृहीत धरल्यास निकाल लागण्यासाठी आज रात्री 9 नंतर पुढे 30 तास पदवीधरसाठी लागू शकतात तर शिक्षकसाठी 16 तास लागू शकतात, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close