Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

बेकायदेशीर रित्या तलवार बाळगणाऱ्या इसमास पुंडलीकनगर पोलीसांनी घेतले ताब्यात.

औरंगाबाद – दिनांक 15/08/2020 रोजी पोलीसा न दक्ष नागरीकाकडुन माहीती मिळाली की, एक इसम पटीयाला बँक चौकात हातामध्ये 1चाकु घेवुन रसत्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चाकुचा धाक दाखवुन दहशत निर्माण करत आहे अशी माहीती वरून गजानन मंदीर येथे नाकाबंदी वरील पोशि/958 राठोड यांना सदर ठिकाणी जावुन खात्री करुन सदर इसमास ताब्यात घेणे बाबत सांगितल्याने पोशि/958 आशिष राठोड हे तात्काळ सदर ठिकाणी जावुन चाकु हातात घेवुन फिरणाऱ्या इसमास ताब्यात घेतले व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख अशरफ शेख मिराज अन्सारी वय 25 वर्षे धंदा पान टपरी रा. हुसेन कॉलनी, ग.नं. 04 गारखेडा *परिसर औरंगाबाद असे सांगितले व सदर ठिकाणी दक्ष नागरीकांनी दिलेल्या माहीती वरुन दोन
पंचा समक्ष त्याच्या पान टपरीची झडती घेतली असता त्याच्या पान टपरी मध्ये बेकायदेशीर रित्या
एक धारदार तलवार मिळुन आल्याने ती पंचासमक्ष जप्त करुन त्याच्या विरुध्द पोशि/958 आशिष
राठोड यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवुन फिर्याद दिल्याने गु.र.नं. 317/2020 कलम 4.25
भा.ह.कायदा सह कलम 135 म.पो.अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास सदर गुन्ह्यात अटक केली.सदरची कारवाई मा.पोलीस उप-आयुक्‍त परिमंडळ-2 श्री दिपक गिऱ्हे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र साळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घनश्याम सोनवणे स.पो.नि.पोस्टे पुंडलीकनगर, पोउपनि प्रभाकर सोनवणे, आर.के.मुळे, पोह रमेश सांगळे, बाळाराम चौरे, आशिष राठोड, जालिदर मांन्टे, यांनी केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close