Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा निषेध

टीव्ही सेंटर चौकात केले सकल मराठा समाजाने आंदोलन


औरंगाबाद /संभाजीनगर : महसूलमंत्री तथा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाचऔरंगाबाद शहरात आले असता त्यांच्या नियोजित दौऱ्यातील एका कार्यक्रमात औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामांतराला विरोध केल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा तीव्र निषेध टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शुक्रवारी (दि.१) करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजी नगर करण्यात यावे अशी सर्वच स्तरातून मागणी होत आहे. याबाबतचा ठरावही राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र यावर अद्यापही निर्णय झाला नसल्याने संभाजीनगर नामांतराला सकल मराठा समाजाच्या वतीने समर्थन देण्यात आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर करण्यात यावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असून त्यात महाविकास आघाडीतील भागीदार असलेले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र माध्यमांसमोर आपला विरोध संभाजीनगर नामांतराला दर्शविल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक बाळासाहेब औताडे, ज्ञानेश्वर शेळके, राम आधाने, संदीप मालोदे, शुभम गाडेकर,  मनीष वानखेडे, सतीश इंगळे, संतोष रोठे, प्रशांत जाधव, योगेश काळे, रोहित चव्हाण, गणेश जाधव, गणेश मानकापे, ऋषी मुळे, रोहन म्हस्के, अरुण तांदळे, प्रमोद गोटे, रोहित देवकर, युवराज शिवणकर, गजानन कोलते, यांनी तीव्र संताप व्यक्त करत आपला निषेध व्यक्त केला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close