Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

वचन..…

वचन आईला । माझा असणार ।

नित्य स्मरणार । कर्म तिचे ।।

पांग फेडण्यास । प्राणही देईल ।

चरणी होईल । लिन तिच्या ।।

माझ्या वर्तनाने । दुनिया आनंदी ।

होईल स्वच्छंदी । पाखरेही ।।

वचन गुरुला । शिष्य आज देतो ।

आशीर्वाद घेतो । झुकूनिया ।।

ज्ञानाचा वापर । जनहितासाठी ।

नित्य सत्यासाठी । करणार ।।
बहिणीला माझा । वचन असेल ।

प्रेमात नसेल । स्वार्थ माझा ।।
आहे बहिणही । मज आईसम ।

मजला संयम । तिच्यामुळे ।।
तिने कष्ट केले । म्हणून शिकलो ।

दुःखात हसलो । ताईमुळे ।।
माझे मित्र सदा । पाठीशी राहले ।

सदैव धावले । मदतीला ।।
त्यांनाही वचन । आजच्या घडीला ।

भुलने प्रितीला । त्यांच्या नाही ।।
मानतो बहीण । जिला मनातून ।

जाईल मरून । तिच्यासाठी ।।
माझ्या मैत्रिणीला । सुखी ठेवणार ।

नाही करणार । भेदभाव ।।
देशहितासाठी । झटत राहील ।

आयुष्य वाहील । देशासाठी ।।
अजुचे वचन । म्हणजे जीवन ।

करणे जतन । जन्मभर ।।

©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,तरनोळीता.दारव्हा,जि.यवतमाळ मो.८८०५८३६२०७

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close