Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पनवेल महानगरपालिकेत कोविड-19च्या उपाययोजनेला प्राधान्य द्यावे – राज्यमंत्री कु. आदिती तटकरे

पनवेल महानगरपालिकेत कोविड-19च्या उपाययोजनेला प्राधान्य द्यावे
– राज्यमंत्री कु. आदिती तटकरे
मुंबई, दि. 1७ :राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता वैद्यकीय सेवा आणि कोविड-१९च्या उपाय योजनांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, आशा सूचना उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिल्या.
मंत्रालयात आज पनवेल महानागरपालिकेतील कोविड-19 उपाय योजना संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते.
कुमारी तटकरे म्हणाल्या, कोविड-19च्या रुग्णांची वाढीती संख्या पहाता येणाऱ्या काळात पालिकेच्या इतर खर्चांवर नियंत्रण ठेवून वैद्यकीय सुविधांवर अधिक भर देण्यात यावा. सद्यस्थितीत महानगरपालिका हद्दीतील डॉक्टरांची संख्या, हॉस्पिटल्स, उपलब्ध खाटा, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन पुरवठा या बाबींकडे अधिक लक्ष दयावे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या सर्वेक्षणात आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींसोबत स्थानिक लोकप्रतिनीधींनी तरुण स्वयंसेवकांना सहभागी करुन घ्यावे, तसेच या टीम नी घरोघरी जाऊन नागरिकांची वैद्यकीय माहिती संकलन करून योग्य मार्गदर्शन करावे आणि नागरिकांनी सुद्धाया टीमला सहकार्य करावे असे आवाहनही कु. तटकरे यांनी यावेळी केले.
बैठकीला महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close