Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

बिलोली तालुक्यातील प्रेमीयुगुलाची मन्याड नदीत उडी घेऊन आत्महत्या


नायगाव ता : शेषेराव कंधारे

बिलोली तालुक्यातील केरुर येथील तरुणी आणि किनाळा येथील तरुणाचे एकमेकांवर प्रेम होते मात्र प्रियसी तरुणीचा विवाह चोंडी तालुका धर्माबाद येथील तरूणा सोबत समाजाच्या रीतिरिवाजा प्रमाणे 29 मे रोजी करण्यात आल्यानंतर या प्रेमीयुगुलाने पलायन करून देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मन्याड नदीपात्रात दोघेही एकमेकांना ओडनीने बांधून आत्महत्या केले .हि घटना दि.२३जुन रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेमुळे शंकरनगर परिसरात एकच खळबळ उडाली.


बिलोली तालुक्यातील केरुर येथील भाग्यश्री पिराजी चिमणापुरे वय वर्ष १९ या तरुणीचे किनाळा येथील प्रविण त्र्यंबक कौठकर वय वर्ष २१ या तरुणासोबत मागील काही दिवसापासून एकमेकावर प्रेम असताना त्यांच्या इच्छेच्या विरूध्द हा विवाह करण्यात आल्याने हि मुलगी सासर येथून माहेरी म्हणून आली असता ती दि.22 मे च्या मध्यरात्री घरातून निघून आपल्या प्रियकरासोबत पलायन करून गेले होते.

आपल्या प्रियकरापासून आपले संबंध दूर झाल्याचे दुःख तिच्या व त्याच्या मनी होते त्यामुळे त्यानी दिनांक 23 जून रोजी सदर युवती आणि किनाळा येथील तिचा प्रियकर यांनी पहाटे देगलूर रोड वरील वझरगाव येथील मन्याड नदीच्या नदिपात्रात नांदेड-देगलुर राज्यमहामार्गा पासून सुमारे शंभर फुट पायी जाउन नदीपात्राच्या कडेला मुलीचा फोटो, मुलाचा आधार कार्ड, दोघाच्या पायातील वाहन आणी मुलीची ओढणी कडेला ठेवून दोघेही एकमेकांच्या कबंरेला ओडणीने बांधुन शेवटची घटका एकमेकांच्या मिठीत घालत दोघांनीही या जगाचा निरोप घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन घडलेल्या घटनेचा रितसर पंचनामा करून दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले .या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे . या घटनेची मुलीचे वडील मरीबा चिमनापुरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुण रामतीर्थ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मीत मूत्युची नोंद करण्यात आली असून हि घटना समजताच बिलोली येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्र्वर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पहानी केले असून या घटनेचा पुढिल तपास सपोनि सोमनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close