Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

नम्रता स्वीटतर्फे दिवाळीनिमित्त ‘प्रि-बुकिंग ऑफर विक’ योजना

नम्रता स्वीटतर्फे दिवाळीनिमित्त ‘प्रि-बुकिंग ऑफर विक’ योजना

 औरंगाबादः येथील नम्रता स्वीट्सतर्फे दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी दरवर्षीप्रमाणे खास ‘प्रि बुकिंग बिग ऑफर विक’ योजना सादर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ १० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहेत. या अंतर्गत किमान तीन हजार रुपयांच्या खरेदीवर नम्रता टेक अवे पाणीपुरीचा फॅमिली पॅक मोफत, याशिवाय बऱ्याच ऑफर्स आहेत. यामध्ये ग्राहक स्वीट, नमकीन, बेकरी अथवा पाणीपुरीची खरेदी करू शकतात, अशी माहिती नम्रता स्वीट्सचे संचालक रवि मुगदिया यांनी दिली.

 ते म्हणाले, की दिवाळीला एकाच वेळी खूप मोठी मागणी येत असल्याने, गर्दी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने कॉर्पोरेट कंपनी, शासकीय व खाजगी कार्यालये, शाळा, महाविद्यालय व जास्तीच्या ऑर्डरसाठी ’नम्रता’ने जालना रोडवरील दुकानात बुकिंगची खास व्यवस्था केली आहे.

तीन हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट

‘प्रि बुकिंग बिग ऑफर विक’ योजनेअंतर्गत किमान तीन हजार रुपयांची बुकींग अथवा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नम्रता ग्रुपचा टेक अवे पाणीपुरीचा फॅमिली पॅक गिफ्ट दिला जाणार आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे गिफ्ट पॅकचे नमुने मांडण्यात आलेले असून, त्यानुसार निवड करुन मागणी नोंदविणे ग्राहकांना शक्य होणार आहे.

मिठाई, नमकीन व पाणीपुरीला ग्राहकांचा प्रतिसाद

आजघडीला नम्रता स्वीट्स एक ब्रँड म्हणून उदयास आलेला आहे. येथे मिठाई, नमकीन, बेकरी आणि पाणीपुरी उपलब्ध असलेले एकमेव दालन आहे. नैसर्गिक चव, इसेन्स विरहीत मिठाई, नमकीन आणि टेकअवे पाणीपुरी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रामुख्याने यावर्षी महिनाभर टिकणाऱ्या बाईट आणि चिक्कीच्या सर्व प्रकारांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याशिवाय हनी लड्डु, शुद्ध तुपातील मोतीचूर लाडू, मोहनथाल, ड्रायफ्रूट आणि मिक्स बॉक्सेसलाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. ड्रायफ्रुट, मावा आणि नमकीनचे वेगवेगळे प्रकार ग्राहकांच्या दिवाळीच्या आनंदात नक्कीच भर घालतील, असा विश्वास श्री. मुगदिया यांनी व्यक्त केला.

नम्रता टेकअवे पाणीपुरीला ग्राहकांचा प्रतिसाद

शहरातील नम्रता स्वीट्सचे मोंढा नाका येथील दालन, अपेक्षा जनरल टीव्ही सेंटर (हडको),लोकसेवा जनरल बजरंग चौक एन सहा,महावीर सुपर मार्केट कॅनॉट प्लेस, नवजीवन मेडीकल एन ३, रिद्धी सुपर एन ४, न्यु राहूल प्रोव्हीजन उल्कानगरी,पकंजकुमार अ‍ॅन्ड सनस सुतगिरणी चौक, विपुल सटेशनरी बन्सीलालनगर,केशर सुपर मार्केट छावणी, राजदरबार एनएक्स उस्मानपुरा,सुदर्शन मेडीकल गुलमंडी आणि अनुपम स्टोअर अंगुरीबाग या तेरा ठिकाणी कंपनीचे टेक अवे आऊटलेट काऊंटर ग्राहकांसाठी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत उपलब्ध आहे. या सर्व टेक अवे आऊटलेटला ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळतोय.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close