Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

वर्तमानपत्रांच्या वर्तमानावर सकारात्मक चर्चा वसंत मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याला विचारपिठाचे स्वरुप


औरंगाबाद –  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद विभागीय कार्यालयात पत्रकारिता, वृत्तपत्र विक्रेते संघटना, राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, प्रशासकीय आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत वर्तमानपत्रांच्या वर्तमानावर सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे अभिष्टचिंतन सोहळ्याला विचारपिठाचे स्वरूप आले. तसेच कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुटवडा झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकारांचे महारक्तदान शिबीर व रस्त्यांवरील गरजूंना उबदार कपड्यांचे वाटपही केले.
महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि. 1 जानेवारी 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय कार्यालय औरंगाबाद व लायन्स ब्लड सेंटरच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे उद्घाटन दै.पुढारीचे संपादक धनंजय लांबे यांच्या हस्ते झाले. या रक्तदान शिबिराला पत्रकारांसह सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
राज्य पत्रकार संघाच्या उपक्रमांचे इतरांनीही अनुकरण करावे-जगदीश बियाणी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा रस्त्यावरील गरजूंना उबदार कपडे वाटपाचा त्सुत्य उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजातील गरजूवंत व्यक्तींना मदतीची खरी गरज असते. कोरोनामुळे समाजात दात्रूत्वाची भावना वाढली आहे. देणार्‍यांचे हात हजारो नाही तर करोडोंच्या संख्येत पुढे येत आहेत. राज्य पत्रकार संघाच्या उबदार कपडे वाटपाच्या त्सुत्य उपक्रमाचे इतरांनी अनुकरण करावे, असे आवाहन दै. मराठवाडा साथीचे संपादक जगदीश बियाणी यांनी केले.
कलाकार घडवण्यात पत्रकारांचे योगदान मोलाचे – मेघराज राजे भोसले
कलाकार घडवण्यात पत्रकारांचे योगदान मोलाचे असते. समाजात कलाकारांची चांगली प्रतिमा उभी करून मनोरंजन हे माध्यम समाज प्रबोधनात अग्रसेर असल्याचे पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून सतत मांडत असतात. वसंत मुंडे यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ कालावधित कलाकारांबद्दल पोषक लिखाण करून आम्हाला नवी उर्जा प्राप्त करून दिली आहे, असे मत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी व्यक्त केले. पत्रकार नेहमीच समाजातील समस्या, विविध प्रकारचे चांगले काम जनतेपर्यंत मांडत असतात. यासोबतच एखादा चांगला कलाकार जेव्हा या क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडत असतो, तेव्हा त्यांनी केलेला संघर्ष व चांगली कलाकृतीची जनतेला माहिती देणारा पत्रकार हाच खर्‍या अर्थाने कलाकारांना न्याय मिळवून देत असतो म्हणून आम्ही तुम्हा सर्व पत्रकारांचे कायम ऋणी राहू, अशा शब्दात त्यांनी वसंत मुंडे यांच्या माध्यमातून सर्व पत्रकारांचे आभार मानले.
या अभीष्टचिंतन सोहळ्याला आ. अतुल सावे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, दै. लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक, मनसचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे, डॉ. सुधीर निकम, एमजीएम फिल्म आर्ट  डिपार्टमेंटचे शिव कदम, अभिनेते संतोष पारे, चित्रपट महामंडळ व्यस्थापक उमेश पाटील, डॉ. कृष्णा माळकर, डॉ. जिवन राजपुत, गायक दीपक गिरी, औरंगाबाद वृत्तपत्र संघटना, पोलीस बॉईज संघटनेचे रवी वैद्य आदींची उपस्थिती होती.  या वेळी जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ प्रभू गोरे, महानगर अध्यक्ष अनिल सावंत, सचिव दिपक म्हस्के, संघटक विलास शिंगी, प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी, प्रशांत सुर्यतळे, किशोर दहिवाडे, सतिष छापेकर, सचिन अंभोरे, निलम कांबळे, सिद्दी घायाळ, छायाचित्रकार माजेत खान तसेच लायन्स ब्लड सेंटरचे डॉ. प्रकाश पाटणी, डॉ. गंगाधर केकाणे, मनोज चव्हाण, शेख जाकीर, आश्‍विनी नरवडे, भरत पाटणकर, नागेश हिवराळे आदींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close